आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायरंद चित्रपटाचा प्रीमिअर शो ऑगस्टमध्ये परदेशात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दिग्दर्शक रमेश पोपट ननावरे नगरचे लेखक आशिष अशोक निनगुरकर यांच्या "रायरंद’ या चित्रपटाचा प्रीमिअर ऑगस्टमध्ये परदेशात होणार आहे. उद्योजक फेड्री रिगन यांच्या संस्थेतर्फे या चित्रपटाचा प्रीमियर लंडन, कॅनडा, सिंगापूर दुबई येथे करण्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती निर्माते सुरेश शेट्टी यांनी दिली.

न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज समृद्धी मुव्हीजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पुणतांबे (ता. राहाता) येथे झाले असून जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी त्यात अभिनय केला आहे. या चित्रपटात बहुरूपी बालमजुरीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. लहान मुलांच्या हातात पाटी आणि पेन्सिल असायला हवी, पण त्यांना काम करावे लागते. या चित्रपटात लोककलावंत बहुरूप्याची गोष्ट मांडण्यात आली आहे. हा बहुरूपी पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर कष्ट करतो. त्याने भोगलेल्या यातना, त्याचा संघर्ष यात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात अनंत जोग, रणजित कांबळे, श्यामकुमार श्रीवास्तव, आशिष निनगुरकर, करण कदम, आनंद वाघ, अजित पवार, प्रवीण भांबळ, सुनील जैन, सुरेश दाभाडे, रेखा निर्मळ, गोरख पठारे, झाकीर खान अनुराग निनगुरकर आदींच्या भूमिका आहेत. कॅमेरामन राजेश वाव्हळ, कलादिग्दर्शक सुभाष कदम असून कार्यकारी निर्माते भावेश लोंढे हे आहेत.
कलावंतांचे कौतुक
आता मराठी चित्रपटही सातासमुद्रापार जात आहेत. याचा मराठी चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच फायदा होईल. रायरंद चित्रपट महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. परदेशात प्रीमियर होत असल्याने या चित्रपटातील कलावंत तंत्रज्ञांचे कौतुक होत आहे. आनंद निनगुरकर, चित्रपट लेखक.
बातम्या आणखी आहेत...