आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रायरंद'चे चित्रीकरण अवघ्या १२ दिवसांत झाले पूर्ण, णतांब्यात झाले सर्व चित्रीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - न्यूटेलेंट सर्च मुव्हीज वस्तुस्थिती फिल्म्सची निर्मिती असलेल्या 'रायरंद' चित्रपटाचे चित्रीकरण पुणतांबे येथे अवघ्या १२ दिवसांत पूर्ण झाल्याची माहिती निर्माते विकास गांधले यांनी दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश पोपट ननावरे यांचे असून कथा-पटकथा-संवाद नगर येथील आशिष निनगुरकर यांची आहे. कॅमेरामन राजेश वाव्हळ आहेत, तर कार्यकारी निर्माते भावेश लोंढे असून कलादिग्दर्शन सुभाष कदम यांनी केले आहे.

बहुरूपी बालमजुरीवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट अाहे. ज्यांच्या हातात पाटी आणि पेन्सिल असायला हवी, त्यांना मजबुरीमुळे रोजंदारीवर काम करावे लागते. या चित्रपटात लोककलावंतांची गोष्ट मांडण्यात आली आहे. हा बहुरूपी पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर कष्ट करतो. जेव्हा हा बालमजूर मोठा होतो, तेव्हा तो लहान मुलांसाठी काहीतरी करण्यासाठी धडपडतो. पण गावातील आमदारांचा कार्यकर्ता बहुरूप्याची झोपडी जाळून त्याला रस्त्यावर आणतो. मग हा बहुरूपी या सगळ्या गोष्टींचा बदला कसा घेतो, त्या आमदाराच्या कार्यकर्त्याला शिक्षा होते का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे चित्रपट बघितल्यावरच मिळतील.
पुणतांबे गावातील चांगदेव मंदिर, खंडोबा मंदिर, आदर्श शाळा, जैन धर्मस्थानक, आशा केंद्र, इंदिरानगर, दाभाडे टपरी, गावातील चावडी, वेस आणि वाकडी रोड अशा विविध ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. त्यासाठी गावातील संतोष चोरडिया सुरेश दाभाडे यांचे सहकार्य मिळाले.

या चित्रपटात अभिनेते अनंत जोग यांच्यासह रणजित कांबळे, आशिष निनगुरकर, श्याम श्रीवास्तव, करण कदम, आनंद वाघ, झाकीर खान, नाना शिंदे, अनुराग निनगुरकर, अजित पवार, प्रवीण भांबळ, सुनील जैन, रेखा निर्मल, नाना कर्डिले, स्वप्नील पवार, युवराज कुंभार, अमृता पाटील, सुनील लांबदाडे, उत्कर्षा चोरडिया, सिद्धेश दळवी, राजू ईश्वरकट्टी, उद्धव देवकाते, फिरोज खान, अशोक निनगुरकर, अनिल गोसावी, नारायण पवार, अजित पवार, अनुज गोसावी, प्रवीण भांबळ, स्वप्नील निंबाळकर, सागर कांबळे, वृषभ निकम, सागर भोसले, रेखा निर्मळ, दर्शना गोरे, सुनील जाधव गोरख पठारे आदींच्या भूमिका आहेत.

छायाचित्र: रायरंद चित्रपटाचे पुणतांबे येथे चित्रीकरण सुरू असतानाचे दृश्य.