आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Visit Javkhede Village Dalit Family

मनसेच्या पराभवाची कारणे भीषण, पक्षात मोठे फेरबदल करणार, राज ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पराभव सर्वत्र झाला. पराभव नेमका कशामुळे झाला याची माहिती घेण्यासाठी मी राज्याच्या दौर्‍यावर निघालो आहे. याद्वारे जनतेचे मत जाणून घेणार आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मनसेच्या पराभवाची कारणे भीषण आहेत, त्यामुळे पक्षात आवश्यक ते बदल करणार असल्याचे सूतोवाच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी येथे केले. शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे राज ठाकरे यांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेतली. नंतर ते नगर येथे आले. ठाकरे म्हणाले, राज्यातील पराभवाबाबत पक्षाच्या पदाधिकार्‍यांचे कार्यकर्त्यांचे म्हणणे समोर येत आहे, पण मला जनतेमध्ये जाऊन पराभवाची संपूर्ण माहिती घ्यायची आहे. ते जाणून घेण्याआधी त्याचे विश्लेषण केले, तर ते चुकीचे ठरेल.

जवखेडेप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा
जवखेडेखालसा येथील जाधव कुटुंबीयांच्या तिहेरी हत्याकांडाची माहिती घेतली असून त्याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. आता सरकार स्थापन झाले असून ते यात लक्ष घालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगर जिल्हा अत्याचारग्रस्त जाहीर करा, अशी मागणी केली जाते; पण ते महत्त्वाचे नाही. कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. अगोदरच्या सरकारच्या काळात येथे दलित अत्याचाराच्या दोन घटना घडल्या. ही घटना सरकार नसताना घडली. भीतीच राहिली नसल्यामुळे कायद्याची कडक अंमलबजावणी करावीच लागेल, असेही ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

... ते टोलनाके बंद झालेच पाहिजेत
टोलनाक्यांमधील व्यवहारांत पारदर्शकता असावी. जे टोलनाके बीओटीवर दिलेले आहेत, ज्यांची मुदत संपली आहे, असे टोल बंद झालेच पाहिजेत. ज्या ठिकाणी टोल चालू आहेत, तेथील व्यवहारात पारदर्शकता असावी, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. नव्या मुख्यमंत्र्यांना मी चांगला ओळखतो. ते चांगले आहेतच, पण आता त्यांना चांगले निर्णयही घ्यावे लागतील, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.