आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजा पुरोहित यांचे 6 ला व्याख्यान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पुणे येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार राजा पुरोहित यांचे 'कॅमेऱ्याच्या नजरेतून वन्यजीवन' या विषयावरील व्याख्यान प्लस फाउंडेशनच्या वतीने 6 नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये होणार असून तो सर्वांसाठी खुला आहे.

भारतातील मोजक्या वन्यजीव छायाचित्रकारांमध्ये पुरोहित यांचा समावेश होतो. देशातील सर्व संरक्षित अभयारण्यांमध्ये सर्व ऋतूंमध्ये त्यांनी वन्यजीवांचे छायाचित्रण केले आहे. छोट्या कीटकांपासून हत्तींपर्यंत अनेक श्वापदांची छायाचित्रे त्यांनी टिपली आहेत. पुरोहित यांनी काढलेल्या छायाचित्रांबरोबर त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी नगरकरांना या कार्यक्रमात मिळेल. छायाचित्रामागील गोष्ट जाणून घेण्याबरोबर अनेक नव्या बाबी यानिमित्ताने नागरिकांना समजतील. महाराष्ट्रात दुर्मिळ होत चाललेल्या माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पुरोहित यांनी छायाचित्रणाचा कसा उपयोग केला, हे यानिमित्ताने कळेल.

वन्यखात्याच्या पुस्तिकांवर असणारी छायाचित्रे पुरोहित यांनी काढलेली असतात. उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले आहेत. वन्यजीवन लोकसहभाग या विषयावर त्यांनी राज्याच्या विविध भागात प्रदर्शने भरवली आहेत. परदेशातील वन्यप्रेमींना भारताकडे आकृष्ट करण्यात पुरोहित यांचा मोठा वाटा आहे. नगरमधील कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी संगीत कळसकर (९४ २३ १६ १३ ६९) किंवा पंकज मुनोत (९४ २२ ०८ १६ ६१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...