आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajeev Rajale News In Marathi, Congress, Nagar Lok Sabha Constituncy, Divya Marathi

राजीव राजळे सर्मथकांकडून भाजप प्रतिनिधीला मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - कासार पिंपळगाव येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याची तक्रार, तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजीव राजळे सर्मथकाकडून भाजपच्या मतदान प्रतिनिधीस मारहाण झाल्याचा प्रकार चितळी येथे घडला.
यासंदर्भात महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी, लोकशासनचे उमेदवार बी. जी. कोळसे, बाळासाहेब ताठे यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कासार पिंपळगाव केंद्रासह पंचायत समिती गणात फेरमतदान घेण्याची मागणी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.


कासार पिंपळगाव मतदान केंद्रावरील भाजपचे मतदान प्रतिनिधी संदीप राजळे यांनी राजळे सर्मथकाकडून मारहाण झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्या कारचा चालक बनावट नावाने मतदान करण्याचा प्रयत्न करत होता. त्यास रोखण्याचा प्रयत्न केला असता, राजळे सर्मथकांनी मारहाण केली. याप्रकरणी मतदान केंद्राध्यक्षांना लेखी तक्रार देऊनही कारवाई झाली नाही. पोलिस ठाण्यात फिर्याद घेण्याचे काम सुरू असताना खासदार गांधी, कोळसे यांच्यासमोरच राजीव राजळे सर्मथकाकडून तलवारीने मारहाण झाली, अशी तक्रार संदीप राजळे यांनी दिली. तासाभराने पोलिस उपाधीक्षक प्रज्ञा जेडगे, पोलिस निरीक्षक उमेश हजारे यांनी घटनास्थळी भेट दिली.