आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajiv Rajale And Dilip Gandhi News In Marathi, Election Expenditure, Lok Sabha Election

निवडणुकीचा खर्च: राजळेंचा 14.90 लाख, तर दिलीप गांधींचा 3 लाख खर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरमधील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजीव राजळे यांनी निवडणूक खर्चात आघाडी घेतली आहे. त्यांनी आतापर्यंत प्रचारावर सर्वाधिक 14.90 लाख खर्च केला असून, त्याखालोखाल भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी 3 लाख 9 हजार खर्च केला.
70 लाख ही खर्चाची र्मयादा आहे. राजळे यांनी 3 एप्रिलपर्यंत 14 लाख 90 हजार 189 रूपये, तर गांधी यांनी 3 लाख 9 हजार 27 रूपये खर्च केला. अपक्ष उमेदवार अनिल घनवट यांनी 2 लाख 500, आम आदमी पक्षाच्या दीपाली सय्यद यांनी 1 लाख 6 हजार 325, तर अपक्ष उमेदवार बी. जी. कोळसे यांनी 67 हजार 223 रूपये खर्च केला आहे.
शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आतापर्यंत सर्वाधिक 9 लाख 3 हजार 429 रुपये खर्च केला. त्याखालोखाल शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी 4 लाख 32 हजार 953 रुपये खर्च केला.
राजळे, कोळसे यांनाही नोटिसा
खर्चात तफावत आढळल्याने आयोगाने राजळे, कोळसे, अजय बारस्कर, दीपाली सय्यद यांना नोटिसा पाठवल्या आहेत. यापूर्वी भाजपचे गांधी यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. 48 तासांच्या आत खुलासा मागवण्यात आला आहे. राजळे यांनी 14 लाख 90 हजार 189 रूपये खर्च सादर केला होता. त्यांनी 6 लाख 92 हजारांचा खर्च कमी नोंदवल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली. कोळसे यांनी 67 हजार 223 खर्च सादर केला होता. त्यांनी 45 हजार 194 रुपये खर्च कमी सादर केला. सय्यद यांनी 1 लाख 6 हजार 325 रूपये खर्च सादर केला. त्यांनी 57 हजार 86 रूपये कमी खर्च दाखवला. वाकचौरे, लोखंडे, उदमले, रोहम यांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.