आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajiv Rajale News In Marathi, Rajale Copy To Narendra Modi's Publicity Concept Divya Marathi

भाजपची ‘चाय पे चर्चा’ राजीव राजळेंकडून हायजॅक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ‘चाय पे चर्चा’ हा प्रचाराचा फंडा भाजपचा. मात्र, या फंड्याकडे महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. हा फंडा राष्ट्रवादीच्या राजीव राजळेंनी हायजॅक केला आहे. नगर लोकसभा मतदारसंघातील विविध महाविद्यालयांत जाऊन राजळे विद्यार्थी-विद्यार्थिनींसोबत ते चहा घेता घेता त्यांच्याशी राजकीय चर्चेसोबतच त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत.

लहानपणी रेल्वेत चहा विकणार्‍या नरेंद्र मोदींवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आपत्तीजनक वक्तव्य केल्यानंतर याच मुद्द्याचा प्रचारासाठी वापर करण्याच्या हेतूने भाजपने ‘चाय पे चर्चा’ हे प्रचार तंत्र सुरू केले. त्याचे लाँचिंगही धूमधडाक्यात झाले. मात्र, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ‘चाय पे चर्चा’ हे प्रचार तंत्र भाजपला गुंडाळून ठेवावे लागले. मात्र, भाजपच्या या प्रचारतंत्राचा नगर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार गांधी यांच्याविरोधात राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजळे वापरत आहेत.

महाविद्यालयांत जाऊन ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. विद्यार्थ्यांना असणार्‍या अडचणी, त्यांचे देशाच्या राजकारणाविषयी मत याबाबत जाणून घेतात आणि आपली बाजू मांडतात. या मतदारसंघाची मतदार संख्या 16 लाख 72 हजार 282 आहे. यातील सुमारे साडे तीन लाख मतदार हे वय वर्ष 18 ते 24 च्या दरम्यानचे व महाविद्यालयात शिकणारे आहेत. यातील बहुतांशी तरुणाई सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरवर जोडलेले आहेत. किंबहूना दैनंदिन वापर करत आहेत. सोशल मीडियाचा प्रचारासाठी वापर करण्यात भाजप इतर सर्व पक्षांपेक्षा कितीतरी पुढे आहे. तरुणाईवर भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा मोठा प्रभाव आहे. या प्रभावाला भाजपच्याच ‘चाय पे चर्चा’ या तंत्राने छेद देण्याचा प्रयत्न नगर मतदारसंघात राजळे करत आहेत. राजळेंचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे मतमोजणी नंतरच स्पष्ट होईल.
भाजपचे प्रचारतंत्र त्यांच्याच विरोधात

नगर लोकसभा मतदारसंघातील सुमारे साडेतीन लाख महाविद्यालयीन तरुणाई प्रथम किंवा दुसर्‍यांदा लोकसभेसाठी मतदान करणार्‍या गटातील आहेत. जोशाने भरलेले हे तरुण मतदानाचा हक्कबजावतातच. एवढेच नव्हे, तर घरातील काही सदस्यांच्या मतांवरही आपल्या विचाराने प्रभाव पाडू शकतात. सोशल मीडियामुळे यातील बहुतांशी तरुणांवर मोदींचा प्रभाव आहे. किंबहूना मोदींची चर्चा करताना दिसतात. तरुणाईला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपच्याच चाय पे चर्चा या प्रचार तंत्राचा वापर भाजपविरोधात राजळे करत आहेत.