आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्व अभियान एक ऑगस्टपासून, 13 नवीन विषयांचा समावेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- महत्त्वाकांक्षी योजना म्हणून गेल्या वर्षी राज्यभर राबवण्यात आलेल्या सुवर्णजयंती राजस्व अभियानाचे दृष्य परिणाम लक्षात घेता या वर्षीपासून पुन्हा विस्तारीत स्वरूपात हे अभियान राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 1 ऑगस्टपासून या अभियानाची सुरुवात झाली असून त्यात नव्याने 13 विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी हे अभियान सुरू करण्यात आले. त्यावेळी 11 विषयांचा या अभियानात समावेश करण्यात आला. राज्यभरातील विविध जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या जिल्ह्यात केलेल्या वेगळ्या प्रयोगांचा समावेश या अभियानात केला होता. नव्याने केलेल्या या प्रयोगामुळे सामान्य जनतेची कामे मार्गी लागण्यास मदत झाली. त्यामुळे हा प्रयोग राज्यभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी त्यांना सुवर्ण जयंती राजस्व अभियानाचे माध्यम मिळाले.
सामान्य नागरिक, शेतकरी व शेतमजूर यांचा विविध प्रश्नांसंदर्भात महसूल विभागाशी संबंध येतो. तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात त्याला वारंवार चकरा माराव्या लागतात. या पार्श्वभूमीवर हे अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वर्षभर 11 मुद्यांवर काम करण्यात आले. त्यापैकी 6 मुद्दे हे कायमस्वरूपी राबवण्याची गरज असल्याने मंत्री थोरात यांनी त्या मुद्यांसह आणखी 13 नवीन मुद्दय़ांचा या अभियानात समावेश केला आहे. विस्तारीत 19 मुद्दय़ांची ही योजना यंदा राज्यभर राबवण्यात येणार आहे.