आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णांनी परवानगी दिल्यास पुरावे देऊ : राजू परुळेकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राळेगणसिद्धी - ‘टीम अण्णा’च्या सर्वच प्रमुख सदस्‍यांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहेत. पाच जणांवर पैशांच्या व अधिकारांच्या गैरवापराचे गुन्हे आहेत. याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत. अण्णा हजारे यांनी परवानगी दिली तर ते पुरावे मी सादर करेन, असे पत्रकार राजू परुळेकर यांनी मंगळवारी राळेगणसिद्धी येथे सांगितले.
परुळेकर व सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रदीप रॉय हे हजारे यांना भेटण्यासाठी येथे आले होते. तथापि, अण्णा त्यांना भेटले नाहीत. त्यामुळे मंदिरात जाऊन यादवबाबांचे दर्शन या दोघांनी घेतले. नंतर परुळेकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. ते म्हणाले, ‘‘मध्यंतरी हजारे व माझ्यात गैरसमज निर्माण झाले होते. माझ्या नावावर काही डाग लागले होते. माझ्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हजारे व राळेगण परिवारावर टीका झाली असेल, बदनामी झाली असेल तर त्याबद्दल माफी मागण्यासाठी मी आलो आहे.’’
‘टीम अण्णा’मधील काहींनी केलेला भ्रष्टाचार व अधिकार आणि पैशांचा गैरवापराचे पुरावे माझ्याकडे आहेत. मात्र, हजारे यांचे नाव त्याला जोडले जाऊ शकते. त्यामुळे मी थांबलो आहे. जर हजारे यांनी परवानगी दिली, तर मी ते सर्व सादर करेन.
जंतरमंतरवर अण्णा हजारे विरुद्ध राजू परुळेकर रंगणार सामना
अण्णा हजारेंवर चौकडीचा दबाव, राजू परुळेकर
हिस्‍सारला जायचे नव्‍हते म्‍हणूनच अण्‍णांचे मौनव्रतः राजू परुळेकर यांचा दावा