आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रक्षाबंधन पत्र स्पध्रेचा उपक्रम कौतुकास्पद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नोकरी, लग्न, शिक्षण यासारख्या कारणांमुळे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. परंतु ‘दिव्य मराठी’च्या रक्षाबंधन पत्र स्पर्धेमुळे हा दुरावा कमी होण्यास मदत झाली. वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रथमच असा कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला, असे प्रतिपादन महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी सोमवारी केले.
रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बहीण-भावासाठी ‘दिव्य मराठी’च्या वतीने घेण्यात आलेल्या रक्षाबंधन पत्र स्पर्धेचे पारितोषिक वितरण झगडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या स्पर्धेला शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो पत्रे ‘दिव्य मराठी’कडे आली. रिध्दी आडेप या मुलीने आपल्या लहान बहिणीलाच भाऊ समजूून लिहिलेल्या पत्राला झगडे यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक देण्यात आले. आशा साठे व एस. एच. तस्मिन यांना अनुक्रमे द्वितीय तृतीय पारितोषिक देण्यात आले.
झगडे म्हणाल्या, विविध शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची असते. ‘दिव्य मराठी’ सुरुवातीपासूनच सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. पत्रकारितेतील नवीन प्रयोग व बातम्यांतील वस्तुनिष्ठतेमुळे कमी कालावधीत या वृत्तपत्राने नगरकरांच्या मनात घर केले आहे. सूत्रसंचालन अविनाश कराळे यांनी केले. यावेळी रक्षाबंधन पत्र स्पर्धेतील स्पर्धक, तसेच त्यांचे पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर ब्युरो चीफ मिलिंद बेंडाळे, मुख्य व्यवस्थापक (मार्केटिंग) प्रवीण ससाणे, वितरण व्यवस्थापक प्रमोद गायकवाड यांनी झगडे यांच्याशी शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.
छोटी बहीण बनली भाऊ
स्पर्धेतील प्रथम विजेती रिद्धीने भाऊ नसल्याने आपल्या छोट्या बहिणीलाच राखी बांधून भाऊ बनवले. तिने लिहिलेले पत्र सर्वांच्याच हृदयाला भिडले. ‘दिव्य मराठी’ने हे पत्र जसेच्या तसे प्रसिध्द केले. पारितोषिक वितरण कार्यक्रमानंतर रिध्दीने दिव्य मराठी कार्यालयातील सर्वांना राखी बांधली.