आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी सैनिकांनी सुदृढ समाजासाठी योगदान द्यावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - माजी सैनिकांनी देशाची सीमा सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. निवृत्तीनंतरही त्यांनी समाज सुदृढ करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन खासदार दिलीप गांधी यांनी गुरूवारी केले.
भाजपच्या वतीने गुरूवारी माजी सैनिक भवनात सैनिक कल्याण बोर्डाच्या सहकार्याने रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खासदार गांधी बोलत होते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांच्यासह उपमहापौर श्रीपाद छिंदम, महिला आघाडीच्या गीतांजली काळे, किशोर बोरा, श्रीकांत साठे, छाया रजपूत, मालन ढोणे, निर्मला भंडारी आदी यावेळी उपस्थित होते. १९६५ आणि ७१ च्या युद्धात सहभागी झालेले माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, तसेच, वीरमाता, वीरपत्नी यावेळी उपस्थित होत्या. कारगिल युद्धात शहीद झालेले शिवा वाघमारे यांची पत्नी शीला वाघमारे अन्य सर्वांचा स्मृतिचिन्ह देऊन यावेळी गौरव करण्यात आला. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी खासदार गांधी अन्य मान्यवरांना यावेळी पारंपरिक राखी बांधल्या.

प्रत्येक मुलीला बहीण मानले, तर कोपर्डीसारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत, असे भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गीतांजली काळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम दीक्षित यांनी केले.


‘सैनिक भवन’ हवे
माजी सैनिकांसाठी नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सैनिक भवन उभारायला हवे, अशी अपेक्षा मेजर मिलिंद तंुगार यांनी व्यक्त केली. १९६५, ७१ च्या युद्धात लढलेल्या माजी सैनिकांना लष्कराच्या रूग्णालयात वैद्यकीय सेवा मिळावी, किमान निवृत्तीवेतन सहा हजार रूपये मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...