आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथर्डीत पाण्यासाठी सर्वपक्षीयांचा मोर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - जुन्या पाथर्डी शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, या मागणीसाठी सोमवारी पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.

शहराला मागील पंधरा वर्षांपासून जायकवाडी प्रादेशिक योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा जायकवाडी धरणातील कमी झालेला पाणीसाठा व या योजनेवर पडलेल्या ताणामुळे सध्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रo्नावर यापूर्वी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी मोर्चा काढला होता. सोमवारी पाणीपुरवठा संघर्ष समितीने मोर्चा काढला. मोर्चाने प्रo्न सुटला नाही, तर नगरपालिका कार्यालयात धरणे आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला आहे. मंगळवारी (25 जून) शहर बंदची हाक समितीने दिली आहे.

मोर्चाला प्रारंभ अष्टवाडा विभागातील चौंडेश्वरी देवी मंदिरापासून झाला. पाणी द्या, नाही तर खुच्र्या खाली करा, अशा घोषणा देत मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा नगरपालिका कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात नगरसेवक बजरंग घोडके, संजय उदमले, नगरसेविका वंदना टेके, माजी नगराध्यक्ष रत्नमाला उदमले, आरती निर्‍हाळी यांच्यासह महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.

पोलिसांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात मोर्चा अडवला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गज्रे, नगरसेवक डॉ. दीपक देशमुख, चाँद मणियार, काँग्रेस तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष फारूक शेख, शिवसेनेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब धस, संतोष मेघुंडे, योगेश रासने, अमोल गज्रे, मुकुंद गज्रे, राजेंद्र दुधाळ, संजय शिरसाठ यांच्यासह अनेक नागरिक या वेळी उपस्थित होते. मोर्चाला सामोरे गेलेल्या मुख्याधिकारी संतोष वारूळे यांनी येत्या चार-पाच दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा विसजिर्त करण्यात आला. मात्र, जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय घेत पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या सदस्यांनी मुख्याधिकार्‍यांच्या दालनात धरणे आंदोलन सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन चालूच होते. नगरसेवक बजरंग घोडके यांनी नगराध्यक्ष आव्हाड हे निष्क्रिय असल्याची टीका या वेळी केली.