आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात सक्षम लोकायुक्त आणण्यासाठी प्रयत्न : शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर- राज्यात सक्षम लोकायुक्त आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी बुधवारी दिली. मंत्री शिंदे यांनी बुधवारी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अण्णांशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. यावेळी त्यांनी ही ग्वाही अण्णांना दिली.

मंत्री शिंदे यांनी जिल्ह्यात आपण सक्षमपणे जलयुक्त शिवार अभियान राबवणार असल्याचे अण्णांना सांगितले. मृद जलसंधारण कामे करताना किंवा नालाबांध करताना गॉर्जची कामे कच्ची रहात असल्याने पाणी साठत नाही. त्यात काही तांत्रिक दोष आहेत. ते आपल्याला दूर करावे लागतील. हे मुख्यमंत्र्याशी बोलावे लागेल, असे अण्णा म्हणाले. राज्य सरकार पाच वर्षांत जलसंधारणाच्या कामांवर सुमारे ३५ हजार कोटी रुपये खर्च करणार अाहे. आपल्या मार्गदर्शनाखालीच योजनांचे नियोजन केले जाईल, असे मंत्री शिंदे यांनी अण्णांना सांगितले. पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने जिल्ह्यात जलसंधारणावर १५ कोटी रुपये खर्च केले. त्यात काही गडबडी झाल्याची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे यांनी केलेल्या चांगल्या कार्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाले, असे सांगून अण्णांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी अण्णा हजारे यांचे सहायक दत्ता आवारी, पोलिस निरीक्षक शरद जांभळे, राळेगणसिध्दीचे सरपंच जयसिंग मापारी, सुरेश पठारे, दादा पठारे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी बुधवारी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.