आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅबिनेट मंत्री त्यांच्या जिल्ह्यापुरतेच आहेत का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील पशुधन वाचवण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मार्चच्या सुरुवातीपासून चारा छावण्या सुरू झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा सत्ताधारी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सोमवारी दिला. शेजारच्या बीड जिल्ह्यात जनावरांच्या छावण्या सुरू आहेत. कॅबिनेट दर्जाचे मंत्री केवळ एकाच जिल्ह्यापुरते आहेत का? असा सवाल करत कर्डिले यांनी मंत्री पंकजा मंुडे यांना टोला मारला. दक्षिण भागातील दुष्काळाची दाहकता लक्षात आणून देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.
खरीप हंगामातील पीकविम्याच्या नुकसानभरपाईचे वाटप करण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने बाजार समिती आवारात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्ष रामदास वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष दादासाहेब चितळकर, जि. प. सदस्य बाजीराव गवारे, दत्ता सदाफुले, पं. स. उपसभापती शरद झोडगे, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, बँकेचे संचालक रावसाहेब शेळके, बाळासाहेब गुंजाळ यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री शिंदे यांचा चिमटा घेताना कर्डिले म्हणाले, २००४ मध्ये पालकमंत्रिपदाची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर हवेत जातो की काय, अशी शंका भिती मनात होती. मात्र, सुदैवाने तसे घडले नाही. त्यावेळच्या दुष्काळाला तोंड देताना योग्य ती पावले उचलत जिल्ह्यात ९० ते ९५ चारा छावण्या सुरू केल्या. यातून लाखभर जनावरे वाचवण्यात यश आले. या छावण्यांमध्ये थाेडेफार कमी-जास्त झाले असले, तरी ठरावीक लोकांनीच घाेटाळे केले. त्यात त्यांचाही दोष नव्हता. चार-चार महिने बिले मिळत नसल्याचे कारण होते. मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यात झालेल्या चर्चेत पशूधन वाचवण्याबाबत चर्चा झाली. यात केंद्राचे अनुदान मिळवायचे असेल, तर छावण्याच सुरू कराव्या लागतील, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मार्चच्या सुरुवातीपासून छावण्या सुरू झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा कर्डिले यांनी दिला.
मेंढपाळांचाच पालकमंत्री
आमदारकर्डिले यांचे भाषण सुरू असताना मेंढपाळांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी करणारी चिठ्ठी त्यांच्याकडे पोहोचली. या चिठ्ठीचा संदर्भ देत कर्डिले म्हणाले, मेंढपाळांचाच पालकमंत्री आहे ना, असे उत्तर दिले. मेंढपाळाचा पालकमंत्री केला असल्याचे त्या दादाला (दादाभाऊ चितळकर) सांगा कोणीतरी, असा टोला त्यांनी लगावला.