आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Shinde Not Pay Attension On Terrorism Radhakrishan Vikhe

शिंदेंकडून दहशतीचा केविलवाणा प्रयत्न, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेड येथील प्रचारसभेत बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे. छाया: अशोक वीर.
जामखेड - गृहमंत्र्यांच्या गावात कैदी तुरुंगातून पळून जात असतील, तर असे गृहमंत्री कायदा काय सांभाळणार? असा प्रश्र करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी राजकारणासाठी जामखेडमध्ये गुंडांना बरोबर घेऊन समाजावर दहशत बसवून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा गृहमंत्री राम शिंदे यांचा प्रयत्न केविलवाणा आहे, असा आरोप त्यांनी केला. अशी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील बाजारतळ येथे सभा झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सत्यजित तांबे, सुधीर राळेभात, अंबादास पिसाळ, अंकुश ढवळे, पंचायत समिती सदस्य शरद कार्ले, किरण पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. बंकट बारवकर, शहराध्यक्ष सुनील शिंदे, युवक कार्यकर्ते अमोल राळेभात, सय्यद जमीर आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, राज्यात गेल्या काही दिवसांत हजार ६३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्याचे कृषी राज्यमंत्री म्हणून काय उपाययोजना केल्या हा प्रश्र आहे. दुष्काळी पॅकेज जाहीर झाले. त्यापैकी जामखेडला त्यातील किती मदत मिळणार हे मंत्र्यांना विचारा. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना जामखेड दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होत नाही हे शिंदेंचे अपयश आहे. या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. धनगर रक्षणासंदर्भात समाजाची दिशाभूल करण्याचे काम या सरकारने केले आहे. न्यायालयाने दिलेले मुस्लिम आरक्षणही या सरकारने काढून घेतले आहे, असे विखे म्हणाले.

जिल्हा बँकेचे संचालक राळेभात यांनी मंत्री शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, सात खात्यांचे मंत्री असलेल्या शिंदे यांच्याकडे असलेली खाती ही पैसे खाण्यासाठीच आहेत. गुंडांना सांभाळून, बोगस कामे करून पैसे मिळवण्याचा एकमेव उद्योगमंत्र्यानी चालवला आहे. बाजार समितीमध्ये आमच्या काही जागा येतानाच उर्वरित जागा खूप थोड्या मतांनी गेल्या आहेत. त्यातून मंत्र्याबद्दलची नाराजी दिसून येते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा दिवस मुक्काम ठोकून असलेले मंत्री पुन्हा परत येणार नाहीत. सूत्रसंचालन आभार मकरंद काशिद यांनी मानले.
मन की नको, तर काम की बात करो...
मनकी बात नको, काम की बात करो लोकसभा निवडणूकीपूर्वी काळा पैसा देशात आणून, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करू म्हणणाऱ्यांना याचा जाब विचारा. मोठ्या घोषणा करण्यापलीकडे प्रत्यक्ष काहीही केले जात नसल्याचा आरोप विखे यांनी केला.