आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Shinde Will Be Guardian Minister Of Nagar District

भाजपचे प्रदेशाध्यक्षपद पाचपुते यांच्याकडे जाणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरजिल्ह्याचे पालकमंत्रिपद गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे, तर भाजपचे प्रदेशाध्यक्षपद बबनराव पाचपुते यांच्याकडे जाण्याची चिन्‍हे आहेत. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी पाचपुते यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढे आले आहे. सोलापूरचे सुभाष देशमुख, पिंपरी-चिंचवडचे अमर साबळे, मुंबईचे शहराध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची नावेही चर्चेत आहेत.
अजून पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे नियोजन समित्यांच्या बैठका रखडल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची नावे निश्चित केली आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे राज्याचे पर्यटन गृहराज्य मंत्री शिंदे यांच्याकडे जाण्याची चिन्‍हे आहेत. शिंदे यांना नगरबरोबरच गडचिरोलीचे पालकमंत्रिपद मिळणार आहे. तसे संकेत शिंदे यांनी चौंडी येथील कार्यक्रमात दिले आहेत. शिंदे हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.
प्रदेशाध्यक्षपद पाचपुतंेकडे जाण्याची शक्यता आहे. पूर्वी प्रदेशाध्यक्षपदासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे. पाचपुते राष्ट्रवादीचे साडेतीन वर्षे प्रदेशाध्यक्ष होते. भाजपकडे मराठा समाजातून सक्षम नाव पुढे येत नसल्याने पाचपुते यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारु
-माझीअजून कोणाशीही चर्चा झालेली नाही. मात्र, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन. वनमंत्री असताना हा विभाग मी क्रमांक एकवर नेऊन ठेवला होता. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्‍यास महाराष्ट्रात पक्ष क्रमांक एकवर नेऊन ठेवेन. संघटनेत काम करण्याची इच्छा असून, पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जातील.''