आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramanjan News In Marathi, Dry Foods Prize Invreese Issue

ईदसाठी सुक्यामेव्याने बहरला नगरचा बाजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुस्लिम बांधवांसाठी पवित्र समजली जाणारी रमजान ईद जवळ आली आहे. ईद आणि शिरखुर्मा हे जणू समीकरणच आहे. शिरखुर्म्यासाठी लागणा-या काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे अशा सुक्यामेव्याच्या मागणीत सध्या मोठी वाढ झाली आहे.दिवाळी आणि ईदसाठी सुक्यामेव्याची मागणी दरवर्षी वाढते. भारतात दरवर्षी सुमारे एक अब्ज किमतीचा सुकामेवा अरब राष्ट्रे व युरोपातून आयात केला जातो. सुकामेव्याच्या किमती यंदा वाढल्या असल्या, तरी मागणीतही वाढ झाली आहे.

काजू, बदाम, बेदाणे, पिस्ता, चारोळ्या, वेलची, सुकी खारीक, खोबरे यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आपापल्या ऐपतीप्रमाणे मुस्लिम बांधव कमी-अधिक प्रमाणात सुक्यामेव्याची खरेदी करतात. रमजानचा उपवास सोडताना खजुराला विशेष महत्त्व असते. खजुराला सध्या भरपूर मागणी आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे खजूर उपलब्ध आहेत. खजूर प्रामुख्याने अरब देशांतून भारतात आयात केले जाते. एरवी बाजारात कधीही पहावयास न मिळणा-या खजुराच्या जातीही सध्या बाजारात मिळत आहेत. इराणी खजूर, मबरूक खजूर, अरबी खजूर, ओमान खजूर, मसकती खजूर आदी प्रकार लोकप्रिय आहेत. हा खजूर इराण, मसकत, ओमानमधून आयात केला जातो. या खजुरांचे भाव 100 रुपयांपासून 400 रुपये किलोपर्यंत आहेत.टरबूज, खरबूज, पपई, चिकू, सफरचंद, पिअर या फळांना विशेष मागणी आहे. पावसाळ्यामुळे सध्या आवक कमी आहे. त्यामुळे या फळांच्या किमती वाढल्या आहेत.

किमती वाढल्या, तरी मागणी
काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, सुकी खारीक, शेवया यांना जास्त मागणी आहे. किमती जास्त असल्या, तरी खरेदीवर फारसा परिणाम दिसत नाही.’’ प्रकाश गाभ्रा, विक्रेते.

खजुराचे भाव प्रतिकिलोमध्ये
अरबी खजूर 400५
मबरूक खजूर 250५
इराणी खजूर 100५