आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामदास आठवले यांचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - तेलंगण वेगळा होत असेल तर विदर्भ का नको? दोन मराठी राज्ये निर्माण होतील, दोन मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आमचा स्वतंत्र विदर्भ राज्याला पाठिंबा आहे, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


महायुतीची सत्ता आल्यानंतर निश्चित विदर्भाचा विकास करून दाखवू, असे सांगून आठवले म्हणाले, अनेक दिवसांपासून ही मागणी होत आहे. अनेकांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. तेलंगण वेगळा होत असेल तर स्वतंत्र विदर्भ का नको?

मराठा समाजाला 25 टक्के आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. मराठा समाज महायुतीबरोबर आला, तर आम्ही सत्तेवर आल्यानंतर आरक्षण देऊ. जागावाटपाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. आम्ही काही जागांची मागणी केली आहे. आम्ही आंबेडकरवादी आहोत, पण काँग्रेस सरकारला खेचण्यासाठी महायुतीशिवाय पर्याय नाही. शिर्डीची जागा आम्ही मागितली नाही, कारण ती शिवसेनेची आहे, असे ते म्हणाले. महायुतीत जागावाटपाबाबतच नाही, तर अनेक मुद्दय़ांवर मतभेद असल्याचेही ते म्हणाले.


आरपारची लढाई करा
सीमेवर कुरापती करणार्‍या आणि भारताबद्दल गरळ ओकणार्‍या पाकशी आरपारची लढाई गरजेची आहे. त्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे. कारगिलच्या वेळीच व्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायला हवा होता. पाकही भारताचाच एक भूभाग आहे. अमेरिकेने लादेनवर जशी कारवाई केली, तशी कारवाई भारताने सईद व दाऊदविरुद्ध करावी, असेही आठवले म्हणाले. देशात दोन मराठी राज्ये निर्माण होतील हे महत्त्वाचे