आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी लाट : कदम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता काँग्रेस-राष्ट्रवादीला वैतागली असून, राज्यात त्यांच्या विरोधात लाट आहे, असा दावा शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सोमवारी केला.
नगर दौ-यांवर आलेल्या कदम यांचे आमदार अनिल राठोड यांनी स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते. माजी नगरसेवक दशरथ शिंदे, मनोज गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. कदम म्हणाले, देशातील नंबर एकचे समृध्द राज्य करण्यासाठी मतदारांनी शिवसेनेला विजयी करण्याचे ठरवले आहे. शिवसैनिकांच्या बळावर तो उद्देश सफल होऊन या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकल्यािशवाय राहणार नाही. अनिल राठोड यांनी २५ ‌वर्षे आपली मोबाइल आमदार म्हणून असलेली प्रतिमा टिकवून ठेवली आहे. स्वच्छ प्रतिमेचा जनसेवक म्हणून जनता पुन्हा त्यांना मोठ्या मताधिकान्‍यानी निवडून देईल,असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.