आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात व जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सण असलेली रमजान ईद मंगळवारी शहर व जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली. पवित्र रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर सकाळी नऊ वाजता औरंगाबाद रस्त्यावरील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. नंतर परस्परांना शुभेच्छा देऊन शिरखुर्म्याचा आनंद लुटण्यात आला. समाजातील वंचित, तसेच गोरगरिबांना मदत देण्यात आली.

नमाज पठाणच्या वेळी पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे, महापौर संग्राम जगताप, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिका-यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.विविध संघटनांतर्फे मेजवानी

आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील चौकांत 6 पोलिस निरीक्षक, 22 उपनिरीक्षक, 206 पोलिस कर्मचारी, 26 महिला कॉन्स्टेबल व महिला होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली होती.