आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर रंगभवनला मिळाला मुहूर्त!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गेल्या 30 वर्षांपासून अडगळीत पडलेल्या ‘रंगभवन’च्या नूतनीकरणाच्या कामास अखेर मुहूर्त मिळाला. नाट्यकर्मींच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने या कामासाठी 30 लाखांचा निधी मंजूर केला. शुक्रवारी (5 जुलै) सकाळी भूमिपूजन करण्यात येणार आहे.

सज्रेपुरा येथील रंगभवन हे खुले नाट्यगृह पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी नाट्यकर्मींनी अनेक आंदोलने केली, परंतु मनपाने प्रत्येक वेळी त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली. शेवटी रंगभवनचा ताबा आमच्याकडे द्या, आम्हीच लोकसहभागातून नूतनीकरण करू, अशी मागणी नाट्यकर्मींनी चार महिन्यांपूर्वी केली होती. महापौर शीला शिंदे यांनी त्यांच्या भावनांचा विचार करत नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांनी प्रस्ताव तयार करून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. विकासभार निधीतून 30 लाखांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी कार्यारंभ आदेश दिला. शुक्रवारी सकाळी 11 वाजता या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

गुरुवारी या परिसराची साफसफाई करण्यात आली. मंजूर झालेल्या 30 लाखांच्या निधीतून पहिल्या टप्प्यात रंगमंच, नाट्यकर्मींसाठी दालन, संरक्षक भिंत, दरवाजे, तसेच प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. नंतर आणखी निधी उपलब्ध करण्यात येईल.