आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधवा महिलेवरील अत्याचार, खूनप्रकरणी आरोपींना पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कर्जत तालुक्यातील भोसा येथे विधवा महिलेवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणातील दोन आरोपींनी पोलिस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी मुकेश विजय चव्हाण (30) व महेंद्र तुकाराम चव्हाण (28, दोघे भोसा) यांना रविवारी कर्जत न्यायालयाने 3 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

एकट्या राहणार्‍या 55 वर्षांच्या महिलेवर अत्याचार करून खून केल्याची घटना शनिवारी (24 ऑगस्ट) उघडकीस आली. पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त अधीक्षक सुनीता साळुंके व उपअधीक्षक धीरज पाटील यांच्यासह श्वानपथकाने घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथकाने तंबाखूच्या डबीवरून माग काढला. त्यावरून पोलिसांनी मुकेश चव्हाण व महेंद्र चव्हाण या गावातील दोघांसह संपत प्रभाकर शिंदे (19, फुंदे) याला संशयावरून ताब्यात घेतले होते. यापैकी दोघांनी पोलिस चौकशीत हे दुष्कृत्य केल्याची कबुली दिली. मुकेश व महेंद्र या दोघांना पोलिसांनी रविवारी दुपारी कर्जत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना 3 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली, अशी माहिती उपअधीक्षक पाटील यांनी दिली. या प्रकरणातील तिसरा आरोपी शिंदे याची अद्याप चौकशी सुरू आहे.