आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; १५ वर्षे सक्तमजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी आरोपीला जिल्हा न्यायालयाने १५ वर्षे सक्तमजुरी ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. किसन दत्तू भांड (५०, धोत्रे बुद्रूक, पारनेर) असे आरोपीचे नाव आहे. दंडातील २० हजार रुपये पीडित मुलीला द्यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.

अल्पवयीन मुलगी आरोपी एकाच गावात रहात होते. मुलीचे आई-वडील, भाऊ मजुरीसाठी बाहेर गेल्यानंतर आरोपीने वेळीवेळी या मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

ही घटना कोणाला सांगितल्यास घरच्यांना ठार मारण्याची धमकी त्याने दिली. त्यामुळे मुलगी बारामतीला मैत्रीणीकडे निघून गेली. तेथून भाळवणीला नंतर घरी पायी जात असताना तिने अत्याचाराची माहिती एका व्यक्तीला सांगितली. त्या व्यक्तीने मुलीला कोतवाली पोलिस ठाण्यात आणले. ही माहिती चाइल्डलाइनला मिळाल्यानंतर संस्थेने मुलीला धीर देत आरोपीविरुद्ध पारनेर पोलिसांत गुन्हा दाखल केला. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे समजले. नंतर या मुलीने एका बाळाला जन्म दिला.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील गोरख मुसळे यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. त्यापैकी काही पंच साक्षीदार फितूर झाले. पण मुलीची, मुलीच्या वडिलांची वैद्यकीय अधिकार्‍यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयाने आरोपीला बलात्कार केल्याप्रकरणी १५ वर्षे सक्तमजुरी १५ हजार रुपये दंड, बालकांच्या लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायद्यानुसार १५ वर्षे सक्तमजुरी २० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. जमिनीच्या वादातून बलात्काराच्या खोट्या आरोपात गुंतवल्याचा आरोपीच्या वकिलांचा दावा अ‍ॅड. मुसळे यांनी खोडून काढला.
बातम्या आणखी आहेत...