आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम गजाआड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - शीतपेयात उत्तेजक द्रव्य टाकून ते अल्पवयीन मुलीला पाजून तिच्यावर अत्याचार करणारा नराधम किशोर भगवान भगत यास पाथर्डी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. चित्रफीत काढून मुलीला व पैशांसाठी तिच्या वडील आणि भावाला तो ब्लॅकमेल करत होता.

चिंचपूर रोड भागात राहणार्‍या भगतने या अल्पवयीन मुलीला 8 जून 2013 रोजी शीतपेयातून उत्तेजक द्रव्य पाजून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची त्याने चित्रफीत काढली. नंतर संबंधित मुलीला ब्लॅकमेल करत त्याने राहत्या घरी व शेवगावमध्ये लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलीच्या वडिलांना चित्रफीत दाखवत त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये भगतने घेतले. त्यानंतर आणखी एक लाखाची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर चित्रफीत प्रसिद्ध करून बदनामीची धमकी त्याने वडिलांना व भावाला दिल्याचे पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.

भगतविरुद्ध बलात्कार व खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यास शुक्रवारी अटक करण्यात आली. तपास सहायक पोलिस निरीक्षक इंद्रभान सरोदे करत आहेत. हा प्रकार उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली.