आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-यास पाच वर्षे सक्तमजुरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपी उल्हास विलास माने (32, जामखेड) याला पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. चाइल्डलाइन संस्थेच्या पाठपुराव्यामुळे सन 2008 मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते.
वडगाव गुप्ता शिवारातील प्रगतीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर उल्हास माने याने अत्याचार केल्याप्रकरणी सन 2008 मध्ये एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील अत्याचारित मुलगी गरोदर राहिली होती. अत्याचारित मुलीस दीपा ऊर्फ नीलम ऊर्फ सुलोचना मिथुन महाले (प्रगतीनगर, वडगावगुप्ता) हिने फूस लावून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले होते. दीपाचा पती मिथुन ऊर्फ सुरेश महाले (अलाहाबाद, हल्ली प्रगतीनगर) याचाही यात सहभाग होता. चाइल्डलाइनने चित्रागल्ली येथून या अत्याचारित मुलीची सुटका केली होती. पोलिसांनी दीपा, मिथुन, उल्हास व टकलू तुपवाला या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपास तत्कालीन पोलिस उपअधीक्षक संदीप डोईफोडे यांनी केला.
उल्हास पवार व मिथुन महाले यांच्याविरुध्द दोषारोपपत्र पाठवण्यात आले. इतर दोन आरोपी मात्र अद्याप फरारी आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 19 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी अत्याचारित मुलगी, वैद्यकीय अधिकारी, तसेच चाइल्डलाइनच्या कार्यकर्त्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी सरकारी पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून उल्हास मानेला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. मिथुन महाले यास पुराव्याअभावी निर्दाेष मुक्त करण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. गोरख मुसळे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. परिमल फळे यांनी सहकार्य केले.