आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गुंगीचे औषध देऊन विवाहित महिलेवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार आणि तिच्या बदनामीची व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा शेवगाव पोलिस ठाण्यातून शून्य क्रमांकाने वर्ग करण्यात आला. याप्रकरणी गुरुवारपर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती.

किसन रूपचंद कडेल, राजू प्रेमचंद कडेल, गोपाळ रूपचंद कडेल (तिघेही रा. सोनई, ता. नेवासे) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी वडाळा बहिरोबा (ता. नेवासे) येथील पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार किसन कडेल याने महिलेला लस्सी पिण्याच्या बहाण्याने त्याच्या दुकानात बोलावले. लस्सीत मिसळलेल्या औषधामुळे महिलेला गुंगी आली. त्याचा फायदा घेत किसनने तिच्यावर अत्याचार केला. नंतर त्याने शिर्डी, सिन्नर, नगरमध्ये लॉजवर नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. हा प्रकार फेब्रुवारी ते सप्टेंबर 2013 या कालावधीत घडला. याबाबत पीडित महिलेने सोनई पोलिस ठाण्यात तक्रारअर्ज दिला होता. तक्रारीनंतर आरोपींनी ईल छायाचित्रांच्या आधारे आपली बदनामी करण्याची व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच सोन्याचे गंठण, झुंबर व 1 लाख रुपये चोरले, असेही या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. तपास सोनई पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन वांगडे करीत आहेत.
तक्रार घेण्यास उशीर?
पीडित महिलेने काही दिवसांपूर्वी सोनई पोलिस ठाण्यात तक्रारअर्ज दिला होता. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा केली. परंतु सोनई पोलिस गुन्हा नोंदवून घेत नसल्यामुळे या महिलेने शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश राठोड यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या सूचनेनुसार पीडित महिलेची तक्रार आधी शेवगाव पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली. नंतर हा गुन्हा शून्य क्रमांकाने सोनई पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.