आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर- अनैतिक मानवी वाहतुकीसाठी पळवण्यात आलेल्या अल्पवयीन पीडित युवतीला संरक्षण देण्याची मागणी चाईल्ड लाईन व स्नेहालयाने केली आहे.
गृहमंत्री, गृहसचिव, पोलिस महासंचालक, नाशिक विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक, तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. बाल न्याय अधिनियमानुसार तपासी पोलिस अधिकार्यांनी जिल्ह्याच्या बालकल्याण समितीसमोर या युवतीला आणून तिला संरक्षण पुरवावे, असे निवेदनात म्हटले आहे.
या युवतीचे वय 17 वर्षे 2 महिने असून वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आहे. या युवतीचे आई, वडील, भाऊ उत्तरप्रदेशात राहतात. सध्या तिचा ताबा संशयास्पद चारित्र्याच्या युवकांच्या टोळीकडे आहे. या टोळीनेच तिच्यावर अत्याचार करून तिला देहव्यापारासाठी शिरपूर (जि. धुळे) येथे विकले असावे. ही युवती, तसेच तिला ताब्यात ठेवणार्या टोळीचे नगर, पुणे आणि शिरपूर येथील पोलिस आणि महिला सामाजिक कार्यकर्त्यांसमोरील घटनेबाबतचे जबाब परस्पर विसंगत आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्यावर आरोप करून ही टोळी आपल्या कारवायांवरून पोलिसांचे आणि प्रसारमाध्यमाचें लक्ष दुसरीकडे वळवत आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी ही टोळी युवतीच्या जीवाशी खेळू शकते. या युवतीच्या जबाबात शिरपूर येथे 5 मुली व महिलांना देहव्यापारासाठी अडकवून ठेवल्याची माहिती उघड झाली. कुंटणखाना चालकांना अटक करून त्या मुलींचीही देहव्यापारातून सुटका करावी, अशी मागणी या संस्थांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.