आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघुशंकेचा बहाणा करत बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी बेड्यांसह पसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लघुशंकेचा बहाणा करत पोलिसांना हिसका देवून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी बेड्यांसह पसार झाला. मुसळधार पावसामुळे मेहेकरी फाट्याजवळ आलेल्या पुरामुळे बस थांबलेली असताना हा प्रकार घडला. मोईन उर्फ भैय्या गुलाब शेख (रा. कौडगाव, ता. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी रात्री नगर तालुक्यातील मेहेकरी फाट्याजवळ घडला.

भय्या शेख याच्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद आहे. काल त्याच्यासह आणखी एका आरोपीला नगरच्या न्यायालयात हजर करण्यासाठी आणलेले होते. न्यायालयातील काम आटोपल्यानंतर पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक सचिन नवगिरे, कॉन्स्टेबल दिपक शेंडे, ज्ञानेश्वर रसाळ हे आरोपींना घेऊन माघारी जात होते. माळीवाडा बसस्थानकावरुन ते निघाले. मुसळधार पावसामुळे रस्त्यात मेहेकरी फाट्याजवळ पुराच्या पाण्यामुळे बस थांबली. त्याचवेळी हा प्रकार घडला. पोलिस आता भय्याचा शोध घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...