आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर : बलात्कार करून विद्यार्थिनीचा खून, आरोपीला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत - तालुक्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून करण्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली. कर्जतमधील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी कर्जत बंद करून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेकडोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे काही काळ शहरात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला. आरोपी जितेंद्र बाबालाल शिंदे यास श्रीगोंदे येथे पोलिस पथकाने अटक केली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी जिल्हा पोलिस उपअधीक्षक घनश्याम पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

कोपर्डी येथील शिवराम गोरख सुद्रिक यांनी दिलेल्या फिर्याद दिली. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील इयत्ता नववीत शिकणारी मुलगी श्रद्धा बबन सुद्रिक (वय १५) सायंकाळी सातच्या सुमारास आजोबांकडे मसाला आणण्यासाठी कोपर्डी येथे सायकलवर गेली होती. ती लवकर परत आल्याने तिला शोध कुटुंबीयांनी सुरू केला. रस्त्यावरील शेतात लिंबाच्या झाडामागे तिचा आवाज आला असता तिथे आरोपी जितेंद्र बाबुलाल शिंदे हा दिसून आला. शेजारीच श्रद्धा नग्न अवस्थेत दिसून आली. त्यावेळी तिच्या अंगावर अनेक जखमा होत्या. नाकातून रक्त येत होते. तिच्या चेहऱ्यावर अनेक जखमा असून त्यातून रक्त येत होते. त्यावेळी आरोपी जितेंद्र यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी हिसका देऊन आपल्या घराकडे पळून गेला. श्रद्धावर पाशवी बलात्कार करून नंतर तिचा निर्घूण खून केल्याचे निदर्शनास आले.
पुढे वाचा... मृत मुलीचा मृतदेह कुळधरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल, नागरिकांनी शांतता पाळून सहकार्य करावे, कर्जतमध्ये पाळला बंद