आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदगाव बलात्कार; मुख्य आरोपी जेरबंद - १५ वर्षांच्या मुलीवर केला होता अत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे येथील १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. मल्हारी सखाराम उमाप (नांदगाव शिंगवे) असे या आरोपीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी घरी भांडी घासायला बोलावून आरोपीने मुलीवर बलात्कार केला होता. एमआयडीसी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला पांढरी पूल ते मिरी रस्त्यावर पकडले.

पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन उमाप याच्यासह आणखी एका अारोपीविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. नगर ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी आनंद भोईटे, एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तपास सहायक निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नागवे करत आहेत. सोमवारी दुपारी पांढरी पूल ते मिरी रस्त्यावर आरोपी उमाप असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
बातम्या आणखी आहेत...