आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्र सेवा दलाच्या विचारांची आज समाजाला गरज : कपोले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - युद्ध सुरू होतात व काही काळानंतर थांबतात, पण लढा मात्र उद्देशपूर्तीपर्यंत निरंतर सुरू असतो. सामाजिक समता स्थापन करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचा लढा वर्षानुवर्षे सुरू आहे. आज समाजाला अशा लढ्यांची व राष्ट्र सेवा दलाच्या विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. अरविंद कपोले यांनी केले.

रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात सेवा दलाच्या "लढा समतेचा' या जिल्हा विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. सेवा दलाचे कार्याध्यक्ष राजा अवसक, जिल्हा कार्याध्यक्ष चंदुलाल सावज, शहर कार्याध्यक्ष विवेक पवार, स्वातंत्र्यसैनिक विमलताई गरुड, रेवाताई कुलकर्णी, पी. एच. शितोळे, भालचंद्र आपटे, नगरसेविका वीणा बोज्जा, विनोद वाघ, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, संतोष पवार, सुधीर लंके यावेळी उपस्थित होते.

कपाेले म्हणाले, सेवा दलाचा इतिहास तरुण पिढीसमोर ठेवताना वास्तवाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या विशेषांकाच्या माध्यमातून होत आहे. सेवा दल हा माणसांचे जगणे समृद्ध करणारा विचार आहे. हाच विचार समाजाला प्रगतिपथावर घेऊन जाऊ शकणारा आहे, याची प्रचिती सर्वांनाच येत आहे.

अवसक म्हणाले, अच्युतराव पटवर्धन, मधू दंडवते, किशोर पवार, दुर्वे नाना, गवारेमामा, डॉ. एस. टी. महाले, किसनराव अरकल अशी मोठी माणसे जिल्ह्यात होऊन गेली. या सर्वांनी समतेचा विचार वाढवला. तो विचार विशेषांकामुळे घराघरांत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. विशेषांकाचे समन्वयक शिवाजी नाईकवाडी यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा आडम, आदित्य पवार व ज्योती रामदिन यांनी सूत्रसंचालन केले. आडम यांनी आभार मानले.