आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रसेविका संमेलन उत्साहात; चर्चासत्र, खेळ, प्रदर्शन प्रश्नमंजूषेचे आयोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : राष्ट्रसेविका समितीचे युवती संमेलन नुकतेच पेमराज सारडा महाविद्यालयात झाले. दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन करताना नाशिक बौद्धिक विभागप्रमुख शुभांगी कुलकर्णी. समवेत रोहिणी शिवलकर, सुनीता कुलकर्णी, दीपाली जोशी.
नगर - राष्ट्रसेविका समितीचे युवती संमेलन पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध चर्चासत्र, खेळ, प्रदर्शन, प्रश्नमंजूषा अशा भरगच्च कार्यक्रमांनी साजरे झाले.
‘तेजोमय भारत’ या विषयावर नाशिक विभाग बौद्धिकप्रमुख शुभांगी कुलकर्णी यांनी सादर केलेल्या स्लाईड शोने संमेलनाला प्रारंभ झाला. उज्ज्वल भारतीय परंपरांनी भारलेल्या भूतकाळापासून ते आजपर्यंतची दिव्य जीवनशैलीचा चित्रमय परिचय त्यांनी करून दिला. स्त्री ही राष्ट्राची मुख्य आधारशक्ती आहे. तिने स्वतःमधील कर्तृत्व उंचावून आपल्या कार्याचा परिघ वाढवावा राष्ट्र बलशाली करावे, असे आवाहन शैला जोशी यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत भूकंप, अतिवृष्टी अशा अनेक विपद्काली राष्ट्रसेविका समितीने समाजात निर्भयपणे कार्य केले आहे, असे सांगून हा वारसा असाच वृध्दिंगत व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सुरेखा विद्ये यांनी मनागत व्यक्त केले. आमंत्रितांचे स्वागत पाहुण्यांचा परिचय संमेलनप्रमुख सुनीता कुलकर्णी यांनी करून दिला. शहर कार्यवाह दीपाली जोशी यांनी प्रास्ताविक केले. नाशिक विभाग सहकार्यवाहिका रोहिणी शिवलकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मुग्धा शुक्रे यांनी सूत्रसंचालन केले. उदघाटनानंतर वयोगटानुसार विविध खेळ घेण्यात आले. विविध विषयांवर चर्चासत्र झाली. ‘अहमदनगरचा इतिहास’ या प्रदर्शनावर प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला.

लेझीम, दंड, मानवी मनोरे यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके समारोपाच्या सत्रात झाली. निबंध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली. शहर परिसरातील २५० युवती संमेलनाला उपस्थित होत्या. संमेलनाचा समारोप वंदे मातरमने झाला.