आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिक्कीवरून तापले राजकारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(राजीनामा घ्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे स्टेट बँक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. छाया: साजिद शेख.)
नगर - चिक्की घोटाळा प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कारवाईच्या मागणीसाठी स्टेट बँक चौकात रास्ता रोको आंदोलन केले, तर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी अधिका-यांवर ताशेरे ओढून महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची पाठराखण केली. अन्न औषध प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने या विभागावरही कारवाईची मागणी काही सदस्यांनी केली आहे.

जिल्हाभरातील सुमारे साडेपाच हजार अंगणवाडीतील लाख ६५ हजार बालकांसाठी चिक्की वाटप करण्यात आली. राजगिरा चिक्कीत माती आढळून आल्याने जिल्हाभरात संताप व्यक्त होत आहे. चिक्कीचे वजन वाढवण्यासाठी पुरवठादाराने चिक्कीत माती मिसळून त्याचा पुरवठा प्रकल्प स्तरावर केला. याप्रकरणी सभापती संदेश कार्ले यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, महिला बालकल्याण समिती सभापती नंदा वारे यांना खाण्यास दिली होती. त्यांनीही मोठ्या प्रमाणात माती असल्याच्या आरोपाला दुजोरा दिला. त्यानुसार महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी चिक्कीचा पुरवठा थांबवून चिक्कीचा पंचनामा केला. एकात्मिक बालविकास आयुक्तांनी खराब चिक्की परत करून चांगली चिक्की घेण्याचा अजब सल्ला झेडपीला दिला होता. पण सर्वसाधारण सभेने ठराव घेऊन कारवाईची मागणी करीत चिक्की परत करण्यास विरोध केला. या प्रकरणाचे लोण थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले असून मंत्री मुंडे यांनाही दोषी मानले जाऊ लागले. यासंदर्भात जिल्हाभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतली.
शनिवारी सकाळी नगर-पुणे रस्त्यावरील स्टेट बँक चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, अभिजित खोसे, भुपेंद्र परदेशी, अजय चितळे, मतीन सय्यद आदी उपस्थित होते. मुंडे यांच्या खात्याचा गैरकारभार कसा झाला याचाही उल्लेख संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून हातात निषेधाचे फलक घेत निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने स्टेट बँक चौकापासून ते महेश चित्रपटगृहा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांशी चर्चा करून सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर मराठा महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख संभाजी दहातोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री मुंडे यांची पाठराखण केली. मातीमिश्रित चिक्कीप्रकरणी मंत्री मुंडे यांना बदनाम करू नये. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आयुक्त सचिव यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी महासंघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार आहे. या प्रकरणात अधिकारी जबाबदार असून पुरवठादारावरही गुन्हे दाखल करायला हवेत. मंत्री मुंडे यांची विरोधकांनी चालवलेली बदनामी थांबवावी. बहुजन समाजातील नेत्यांना महाराष्ट्रात जाणीवपूर्वक टार्गेट केले जाते. चिक्की इतर साहित्य खरेदी करताना प्रत्येक बाब मंत्र्यांना विचारली जात नाही. मुंडे यांनी आरोपांचे खंडन केले असून महासंघ त्यांच्या पाठीशी असल्याचे दहातोंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यभरात चर्चेचा विषय बनलेल्या मातीमिश्रित चिक्की प्रकरणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीकडून मंत्री मुंडे यांच्यावर टीका होत आहे, तर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते तथा मराठा महासंघाचे संपर्कप्रमुख संभाजी दहातोंडे यांनी मुंडे यांची पाठराखण केली आहे.

प्रतिनिधी
काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जी प्रक्रिया होती तीच पुढे आली आहे. चिक्कीप्रकरणात प्रशासकीय यंत्रणा दोषी आहे, त्याचे खापर मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर कशासाठी फोडले जात आहे. या प्रकरणात जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी.'' संदेशकार्ले, सभापती,पंचायत समिती.

अधिवेशनकाळात आंदोलन
चिक्की प्रकरणात अधिकारी पुरवठा दोषी आहेत. त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत. पण विरोधकांनी मंत्री पंकजा मुंडे यांची चालवलेली बदनामी थांबवावी, अन्यथा शेतकरी महासंघ अखिल भारतीय मराठा महासंघ अधिवेशन कालावधीत मुंबई येथे आंदोलन छेडणार आहे.'' संभाजीदहातोंडे, संपर्कप्रमुख,मराठा महासंघ.

मुंडेंनी राजीनामा द्यावा
^राष्ट्रवादीयुवक काँग्रेसतर्फे मातीमिश्रित चिक्की प्रकरणी मंत्री मुंडे यांची न्यायीक आयोगामार्फत चौकशी करावी, त्यांनी राजीनामा द्यावा. या मागणीसाठी आंदोलन केले. भिंगारचे पोलिस निरीक्षक जी. पी. गांगुर्डे यांना निवेदन देण्यात आली. चौकशी करून कारवाई झाल्यास राज्यभर आंदोलन छेडू.'' अभिजितखोसे, प्रभारीशहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.

"अन्न औषध' ची भूमिका गुलदस्त्यात
अन्नभेसळीचा प्रश्नसमोर आल्यानंतर अन्न औषध प्रशासनाने चिक्कीचे नमुने ताब्यात घेऊन कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदस्यांनी बोलावल्यानंतर या प्रशासनाने केवळ पंचनाम्यापुरतीच हजेरी लावली. अद्यापही नमुने तपासणीसाठी घेतले नसल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने यापूर्वीच कारवाई का केली नाही, असा सवालही आता जिल्हा परिषद सदस्यांमधून उपस्थित केला जात आहे.

प्रशासनावर संशय
जिल्हापरिषदेत बोलावल्यानंतर अन्न आैषध प्रशासनचे अधिकारी पंचनाम्यासाठी हजर राहतात. देशपातळीवर विषय गाजला असतानाही त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन नमुने तपासणीसाठी पाठवले नाहीत. या मागे काय गौडबंगाल आहे. याप्रकरणी प्रशासानाचीच चौकशी करावी लागेल.'' बाळासाहेबहराळ, सदस्य,जिल्हा परिषद.
बातम्या आणखी आहेत...