आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे यांच्या चौकशीसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महिलाबाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी एका दसात २०६ कोटींची साहित्यखरेदी करण्याची घाई केली. तीन लाखांवरील खरेदी करताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांची चौकशी न्यायिक आयोगामार्फत व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाजूला करावे, अशी मागणी करून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे.

मंत्री मुंडे यांनी नियमाचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. खरेदीही निकृष्ट दर्जाची करण्यात आली. जिल्ह्यातील आदिवासी मुलांना वाटली जाणारी चिक्कीही निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चौकशीचे आदेश दिले गेले. चिक्की, चटई, डिशेस, पुस्तक अशा साहित्याचीही खरेदी करण्यात आली आहे. त्यासाठी १३ फेब्रुवारीला २४ शासन निर्णय काढले गेले. नवी मुंबईच्या जगतगुरू कंपनीकडून कोटी ६० लाखांच्या वह्या, पुस्तकांची खरेदी करणे रकमेचा धनादेश कंपनीच्या नावे काढता भानुदास टेकवडेंच्या खात्यात जमा करण्यात आला.
बालविकास आयुक्त वनिता सिंघल यांनी नाशिकच्या एव्हरेस्ट कंपनीकडून वॉटर फिल्टर खरेदी करण्यास सहमती दिली. वॉटर फिल्टरची बाजारातील किंमत साडेचार हजार असताना सुमारे सव्वापाच हजारापर्यंत दर वाढवले. सूर्यकांता सहकारी महिला संस्थेला ३७ कोटींच्या चिक्कीच्या पुरवठ्याचे कंत्राट दिले गेले. विशेष म्हणजे या संस्थेकडे चिक्की बनवण्याचा कोणताही प्रकल्प नाही. औषधांच्या किटसाठी ५०० रुपयांची तरतूद असताना कंत्राटदाराने ७२० रुपये किंमत लावली.

याप्रकरणी मंत्री मुंडे यांची विशेष न्यायिक आयोगामार्फत चौकशी करावी, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातूनही काढावे, अन्यथा रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने जिल्हाधिका-यांना दिलेल्या नेदनात दिला आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, कपिल पवार, संजय लोळगे, नीलेश बांगरे, मयूर राऊत आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...