आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rastapura Gramasthanni Be 'the' Hospitality Police Units

रस्तापूर ग्रामस्थांनी केला ‘त्या’ पोलिस पथकाचा सत्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-क्रूरपणे बलात्कार करून खून करणारा विकृत आरोपी अनिल पवार याला अटक करणार्‍या स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पथकाचा रस्तापूरच्या ग्रामस्थांनी सत्कार केला. र्शीरामपूर सत्र न्यायालयाने पवारला दोन दिवसांपूर्वीच फाशीची शिक्षा ठोठावली. पोलिसांच्या चांगल्या कामाची दखल समाजाकडून घेतली जाते हेच रस्तापूरच्या ग्रामस्थांनी दाखवून दिले.
नेवासे तालुक्यातील रस्तापूर येथील अंबिका डुकरे या विद्यार्थिनीचा खून करून आरोपी फरार होता. याच कालावधीत त्याच्या कृत्याच्या आणखी दोन बळी गेले. जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर आलेल्या पवारने अंबिकाचा बळी घेतला होता. जवळपास सात वष्रे तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला होता. त्याच्या अटकेसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने शिताफीने त्याला अटक केली. अटक करताना त्याच्याजवळ सुरा सापडला होता. गुप्तांगावर चाकूने वार करून बलात्कार करण्याची त्याची विकृत मानसिकता होती. शिर्डीत एका अल्पवयीन मुलीचा त्याने याच पद्धतीने बळी घेतला होता.
अंबिकाचा मारेकरी अनिल पवार यास र्शीरामपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने नुकतीच फाशीची शिक्षा सुनावली. त्यावेळी डुक्रे कुटुंबीय व ग्रामस्थांनी तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांना दूरध्वनी करून त्यांचे आभार मानले. न्यायालयाने पवार यास फाशीची शिक्षा देऊन डुकरे कुटुंबाला न्याय दिला. त्यामुळे रस्तापूरच्या ग्रामस्थांनी पवार यास पकडणार्‍या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन निरीक्षक अशोक राजपूत कर्मचारी संजय इस्सर, राजेंद्र वाघ, भरत डोंगरे, शरद लिपाणे आदींचा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सत्कार केला.
याप्रसंगी जिल्हा परीषदेच्या माजी सदस्या विजया अंबाडे, अंबिकाचा मामा ज्ञानदेव कोलते, भाऊ सागर डुकरे, मामेभाऊ राजीव कोलते, शहापूरचे सरपंच माणिक कोलते, रामकृष्ण आंधळे, नाना महाडिक, शिवाजी कोलते यांच्यासह मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.