आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेंड्यात सर्वपक्षीय रास्ता रोको

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुकाणे - जिल्ह्यातील सर्व आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी करणार आहेत. हा निर्णय रद्द केला नाही, तर मंगळवारी मुळा धरणाच्या गेटवर जाऊन गेटबंद आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी सोमवारी दिला.

मुळा धरणातून जायकवाडीस पाणी सोडण्याच्या निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी भेंडे येथे नेवासे-शेवगाव राज्य मार्गावर सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी सर्वच नेत्यांनी जायकवाडीस पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या. मंगळवारी (९ डिसेंबर) मुळा धरणाचे गेटबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. हे आंदोलन एक तास सुरू असल्याने राज्यमार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून वाहतूक खोळंबली होती.

मुळा धरणातून जायकवाडीस पाणी सोडण्याच्या विरोधात सोमवारी माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्या नेतृत्वाखाली भेंडे येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी अॅड. देसाई देशमुख, काशीनाथ नवले, कॉम्रेड बाबा आरगडे यांनी शासनाच्या पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात संतप्त भावना व्यक्त करत जायकवाडीत ४७ टीएमसी पाणी साठा असतानाही पाणी सोडण्याचा हा घात अन्यायकारक असून "मुळा'चे पाणी म्हणजे शेतकऱ्यांचे रक्त आहे, तेच काढून घेणार असेल, तर शेतकरी कसा जगणार, असा सवाल करून "मुळा'चे गेट उघडून देणार नसल्याचे स्पष्ट केले. या वेळी बाळासाहेब नवले, गणेश गव्हाणे, अशोक मिसाळ, तुकाराम मिसाळ, राम पाऊलबुधे, निवृत्ती दातीर, अशोक वायकर यांच्यासह नेवासे, शेवगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुकाणे मंडल आधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देऊन रास्ता रोको स्थगित करण्यात आला