आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेदहा लाख महिला होणार "कुटुंबप्रमुख' !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिधापत्रिका ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याची प्रक्रिया नगर जिल्ह्यात सुरु झाली आहे. नव्या निर्णयाप्रमाणे शिधापत्रिकांवर आता कुटुंबातील ज्येष्ठ महिलेचा कुटूंबप्रमुख म्हणून फोटो असणार आहे. नगर जिल्ह्यातील १० लाख ५६ हजार महिलांचा फोटो आता शिधापत्रिकांवर कुटुंबप्रमुख म्हणून असेल.

गोरगरिबांसाठी असलेल्या रेशनच्या अन्नधान्यांत होणारा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. काळाबाजाराला चाप बसावा, यासाठी राज्य सरकारने शिधापत्रिका ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानांमार्फत पुरवठा विभागाने या ऑनलाइन प्रक्रियेला सुरवात केली आहे. त्यासाठी १० लाख संगणकीकृत फॉर्म जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत. फॉर्म उपलब्ध करुन देण्याचे काम पुरवठा विभागाने निविदा काढून पुण्यातील एका संस्थेला दिले आहे.

ही संस्था हे फॉर्म भरुन ते आॅनलाइन अपडेट करणार आहे. त्यासाठी संस्थेला प्रत्येक फॉर्ममागे रुपये ९७ पैसे दिले जाणार आहेत. स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांकडून फॉर्म भरुन घेणार आहेत. त्यासाठी दुकानदारांना प्रत्येकी फार्ममागे काही शुल्क देण्यात येणार आहे. या फॉर्मवर संबंधित शिधापत्रिकाधारकांचे नाव, गावाचे नाव, तालुक्याचे, जि ल्ह्याचे नाव, स्वस्त धान्य दुकानाचे नाव, वार्षिक उत्पन्न, शिधापत्रिकेचा प्रकार, व्यवसाय, जात, गॅस जोडणी, रॉकेल, पत्ता, व्यवसाय, मोबाइल, बँकेचे नाव, पत्ता, बँकखाते क्रमांक, आयएफएससी कोड आधार क्रमांक याची माहिती घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील चौदा तालुक्यांतील तहसील कार्यालयांमध्ये यंत्रणा उभारण्यात आली आहे.

यापूर्वी शिधापत्रिकेवर कुटुंबप्रमुख म्हणून पुरुष सदस्याचे नाव असायचे. आता या नव्या ऑनलाइन शिधापत्रिकेवर कुटुंबप्रमुख म्हणून घरातील ज्येष्ठ महिलेचे नाव असेल. तिचा फोटोही टाकण्यात येणार आहे. शिधापत्रिकेवर प्रथमच शिधापत्रिकाधारकाचा फोटो टाकण्यात येणार असल्याने त्या-त्या लाभार्थींनाच रेशनचे अन्नधान्य मिळेल. हा सर्व डाटा जमा करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा पुरवठा विभागाला ३१ जुलैपर्यंत मुदत दिली आहे.

ऑनलाइनमुळे थेट मिळणार अनुदान
रेशनकार्डची विस्तृत माहिती भरण्यासाठी दिल्ली येथून फॉर्मचा नमुना आला असून, या फॉर्ममध्ये मराठी, हिंदी इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आला आहे. या फॉर्ममध्ये मी माझ्या कुटुंबीयांची दिलेली सर्व माहिती खरी आहे, असे कुटुंबप्रमुख म्हणून असणार्‍या महिला स्वाक्षर्‍या करणार आहेत. या ऑनलाइन प्रक्रियेमुळे भविष्यात रेशनवरील सर्व अनुदान लाभार्थींच्या थेट बँकखात्यात जमा होणार आहे.

३० जूनपर्यंत फॉर्म भरा
शिधापत्रिका ऑनलाइन करण्यासाठी िशधापत्रिकाधारकांचा डेटा जमा करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवठा विभागामार्फत १० लाख फॉर्म देण्यात आले आहेत. त्यापैकी लाख ५० हजार फॉर्म भरुन जमा करण्यात आले आहेत. या फॉर्मवर कुटुंबप्रमुख म्हणून त्या घरातील ज्येष्ठ महिला असणार आहे. शिधापत्रिकेवर तिचा फोटो असेल. ३० जूनपर्यंत नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानामध्ये जाऊन हे फॉर्म भरुन द्यावेत.'' राहुल पाटील, जिल्हापुरवठा अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...