आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जानकर यांचा राष्ट्रवादीकडून निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दसऱ्याला भगवानगडाखाली झालेल्या सभेत बोलताना बेताल वक्तव्य केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. जानकर यांनी माफी मागावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर मंत्री जानकर यांनी केलेली व्यक्तिगत टीका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटत असून नगरमध्येही राष्ट्रवादीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

यासंदर्भात पक्षाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, भगवानगडाच्या पायथ्यावरून मंत्री जानकर यांनी जे भाषण केले, ते पुरोगामी महाराष्ट्रातील मंत्र्याला शोभणारे नाही. जानकरांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि नगर येथील जिल्हाधिकाऱ्यांबद्दलही अपशब्द काढले. एक मंत्रीच प्रशासनातील अधिकाऱ्यांबाबत असे बोलत असेल, तर सर्वसामान्यांनी काय बोध घ्यायचा? राज्यातील सर्वसामान्य जनतेला आता असुरक्षित वाटू लागले आहे. जानकर यांना सत्तेची मस्ती आली आहे. ज्यांनी भीक मागून मंत्रिपद मिळवले, त्यांना नेत्यांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही राष्ट्रवादीच्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी पक्षाचे आमदार संग्राम जगताप, पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, महिला जिल्हाध्यक्ष माधुरी लोंढे, सरचिटणीस सोमनाथ धूत, दत्तात्रेय वारे, प्रदेश पदाधिकारी अॅड. शारदा लगड, महिला प्रदेश उपाध्यक्ष निर्मला मालपाणी, शहराध्यक्ष रेश्मा आठरे, अभिजित खोसे आदींसह शहरातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...