आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साईबाबा पुण्यतिथी उत्सवात कोटी 71 लाखांचे विक्रमी दान, गेल्या वर्षीपेक्षा एक कोटीचे अधिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- शिर्डीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत सुरू झालेल्या ९९ व्या साईबाबा पुण्यतिथी उत्सव साईसमाधी शताब्दी उत्सवाला देश-विदेशातील तीन लाख २५ हजार साईभक्तांनी येऊन साईबाबांच्या झोळीत संस्थानच्या इतिहासात विक्रमी दान अर्पण केले. मंगळवारी या दानाची मोजदाद करण्यात आली. गेल्या वर्षीच्या पुण्यतिथी उत्सवापेक्षा एक कोटीचे जास्तीचे दान यंदा जमा झाले. साईबाबांची महती जगात दिवसेंदिवस वाढतच आहे. यंदा २९ सप्टेंबर ते ऑक्टोबर या चार दिवसांत साईंच्या झोळीत तब्बल चार कोटी ७१ लाख रुपयांचे घसघशीत दान जमा झाले. गेल्या वर्षी याच उत्सवात तीन कोटी ७२ लाख ८४ हजारांचे दान जमा झाले होते, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली. 

१६ देशांचे परकीय चलन
अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सौदी अरेबिया, श्रीलंका, नेपाळ, चीन, ओमान, कुवैत, थायलंड, हाँगकाँग, अरब अमिरात, कतार. 

असे जमा झाले दान (कंसात गेल्या वर्षीच्या उत्सवातील दान) 
- दक्षिणा पेटी : दाेन कोटी ५२ लाख ६१ हजार ५६६ (एक कोटी ९३ लाख ७००) 
- देणगी काउंटर : एक कोटी १० लाख ४९ हजार २२८ (९६ लाख ८६ हजार ३१९) 
- डेबिट, क्रेडिट कार्ड : ३५ लाख ३८ हजार ५९४ 
- ऑनलाइन देणगी : २५ लाख ७६ हजार २०० (२६ लाख २५ हजार ५०९) 
- धनादेश, डीडी देणगी : २९ लाख ३९ हजार ७८९ 
- सोने ४८६ ग्रॅम : १२ लाख (२३ लाख ४९ हजार ३९८) 
- चांदी ९३५२ ग्रॅम : दाेनलाख ८० हजार (१ लाख हजार ५०१) 
- परकीय चलन : तीनलाख ३६ हजार ४०० (सात लाख २२ हजार ९९) 
- अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना संस्थानकडून सुमारे ३२ हजार दर्शन पास : त्याद्वारे६८ लाख 
- गेल्या वर्षी चपाती मशिन डोनेशनद्वारे : २७लाख ७३ हजार ९००) 

साई संस्थानची बाजारभावानुसार सध्याची संपत्ती अशी 
- सोने ३८० किलो : १०२ कोटी 
- चांदी ४५०० ग्रॅम : १५ कोटी 
- विविध बँकांतील ठेवी : एक हजार ९५० कोटी 
बातम्या आणखी आहेत...