आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादेशिक योजनांसाठी घरगुती वीजदर आकारा, 75 हजार जनता टँकरच्या पाण्यावर अवलंबून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अनेक प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना वीजबिलाच्या थकबाकीमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या योजना सुरळीत चालू राहण्यासाठी वीजबिलाची आकारणी घरगुती दराने करावी, असा सूर जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी आळवला आहे.
फेब्रुवारीपासूनच टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. विहिरींनी तळ गाठला असून तलाव कोरडे पडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी असला, तरी पाणी योजनांसाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. टंचाई निवारणार्थ या योजना सुरू राहणे गरजेचे आहे. पाणी योजनांना सध्या आैद्योगिक दराने वीजबिल आकारणी होत असल्याने त्या वारंवार बंद पडत आहेत. पाणीपुरवठा ही सेवा असल्याने वीजदर आैद्योगिकप्रमाणे न ठेवता घरगुती पद्धतीने आकारल्यास योजना सुरळीत चालवणे शक्य होईल, असा सूर जिल्हा परिषद सदस्यांनी अाळवला आहे. यासंदर्भात बुधवारी झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड यांनी आढावा घेऊन टँकरची स्थिती व मागणी यासंदर्भात माहिती घेतली. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, मीरा चकोर, नंदा वारे, सदस्य अॅड. सुभाष पाटील, सुरेखा इनामके, कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप आदी उपस्थित होते.
विजेच्या दरासंदर्भात लवकरच ऊर्जा मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली जाणार असल्याचे सभेत सांगण्यात आले. पाणी टंचाई भेडसावणाऱ्या चार तालुक्यांतील ३१ गावे, १५४ वाड्यांना दररोज ४० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात पारनेर १८, जामखेड ५, श्रीगोंदे २ व नगर तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे. बोधेगाव व सात गावे, शहर टाकळी व २४ गावांत जलमापक यंत्र (वॉटरमीटर) बसवण्यात येणार आहे. त्यासाठी संकेत एंटरप्रायजेस कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. वॉटरमीटर बसवल्यानंतर वापर झालेल्या पाण्याचीच पट्टी आकारता येईल.

जिल्ह्यातील कोट्यवधींच्या पाणी योजनांना मंजुरी
नव्याने कोट्यवधी रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना जलव्यवस्थापन समितीच्या सभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. कुळधरण (कर्जत), मुठेवडगाव, मालुंजे बुद्रूक (श्रीरामपूर), देडगाव, वडाळा (नेवासे), गुहा व वाड्या, अंबी, दवणगाव, रामपूर (राहुरी), वासुंदे, पळशी, ढवळपुरी, वाघवाडी (पारनेर), लिंगदेव, अंभोळ, देवठाण (अकोले) व नगर तालुक्यातील सारोळा कासार, वाळकी, अकोळनेर, पोखर्डी, टाकळी खातगाव, अरणगाव (नगर) या गावांतील योजनांना मान्यता देण्यात आली आहे.

टँकर भरण्यासाठी उद्भवाचे नियोजन
संगमनेर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच नगर तालुक्यासाठी वसंत टेकडी, पारनेरसाठी मांडओहोळ, जामेखडसाठी चौंडी, श्रीगोंद्यासाठी विहीर अधिग्रहित करून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.