आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविहितेस नातेवाईकाच्या गाडीवर बसून गेली म्हणून विवस्त्र करून मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - तालुक्यातील वडाळी येथील विविहितेस नातेवाईकाच्या गाडीवर बसून गेली म्हणून भावकीतील काही नातेवाइक अशा १५ महिला पुरुषांनी लिंपणगाव शिवारात विवस्र करून मारहाण केली. श्रीगोंदे पोलिसांत आरोपी शेखर वागस्कर, शिवाजी वागस्कर, कुंडलिक चव्हाण, अक्षय वागस्कर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या महिलेस मारहाण झाल्याने उपचारासाठी तिला नगर येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या महिलेने महिला दक्षता समितीपुढे जबाब दिल्याने श्रीगोंदे पोलिसांनी संतोष चव्हाण, तात्या चव्हाण, विलास चव्हाण, शेखर वागस्कर, गोट्या वागस्कर, शिवाजी रामभाऊ वागस्कर, गोट्या चव्हाण, कुंडलिक भालचंद्र चव्हाण, अर्चना चव्हाण, आदिका चव्हाण, योगिता चव्हाण, माई हराळ, छकुली चव्हाण, शालन वागस्कर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.