आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिगत गटारात पडलेल्या बैलाची 18 तासांच्या प्रयत्नांनंतर सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नालेगावातील बागरोजा हडको परिसरातील रस्त्यालगत असलेल्या पंधरा फूट खोल भूमिगत गटारीत पडलेल्या बैलाची दुसऱ्या दिवशी सुटका झाली. हा बैल बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास गटारीत पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. 
 
गटार अरुंद असल्याने बैलाला बाहेर पडता येत नव्हते. गटारीत बैल अडकला असल्याचे काही सुजाण नागरिकांच्या गुरुवारी सकाळी लक्षात आले. त्यांनी महापालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती दिली. सुरुवातीला अथक प्रयत्न करूनही बैलाला बाहेर काढण्यात यश आले नाही. माजी महापौर अभिषेक कळमकर यांना महासभा सुरू असताना ही घटना समजली. त्यांनी यासंदर्भात सभागृहात उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना माहिती विचारून बैल बाहेर काढण्यासाठी तातडीने यंत्रणा पाठवण्याच्या सूचना दिल्या. च्या सुमारास या गटारीच्या बाजूस जेसीबीने खड्डा घेऊन बैलास बाहेर काढण्यात यश आले. अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी ही कामगिरी केली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...