आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिशिंगणापुरात आज महायज्ञ, आरती सोहळा; divymarathi.com वर व्हा आरतीमध्ये सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिशिंगणापूर - शनैश्वर जयंतीनिमित्ताने शनिशिंगणापूर येथे मागील तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू अाहेत. गुरुवारी (२५ मे) शनी महापूजा आणि आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिशिंगणापुरातील भाविक कावडीने काशी येथून गंगाजल आणतात. याच गंगाजलाने महापूजेच्या वेळी शनीला जलाभिषेक केला जाईल. भाविकांच्या दृृष्टीने या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. मात्र, अनेक जण प्रत्यक्ष हजर राहू शकणार नाहीत. त्यामुळे शनिजयंतीच्या या महाआरती सोहळ्याचा लाभ सर्व भक्तगण घरबसल्या divymarathi.com वर घेऊ शकतात.  
 
शनिजयंतीचा दिवस शनीसंबंधित पूजा-अर्चना आणि उपाय करण्यासाठी एक स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण शनिशिंगणापुरात दाखल होतात. घर आहेत पण दारं नाहीत, तरीही येथे चोरी होत नाही अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थानालाही ५०० वर्षांपूर्वीचा इतिहास अाहे. पाचशे वर्षांपूवी वाहत आलेल्या या शिळेतूनच शनिदेव अवतीर्ण झाल्याचे सांगितले जाते.
बातम्या आणखी आहेत...