आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाचणी परीक्षेच्या दिवशीच तिच्यावर निर्घृण अत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बलात्कार खून होण्यापूर्वी ती मला अखेरची भेटली होती, असा महत्त्वपूर्व जबाब लोणी मावळा बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मैत्रिणीने दिला. तिच्यासह पंच साक्षीदार अशा एकूण चौघांच्या साक्षी शुक्रवारी नोंदवण्यात आल्या. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरु आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी या साक्षी नोंदवल्या.
२२ ऑगस्ट २०१४ रोजी पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील दहावीत शिकणाऱ्या मुलीचा बलात्कार करुन खून करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक शरद जांभळे यांनी संतोष विष्णू लोणकर, दत्तात्रेय शंकर शिंदे (दोघेही लोणी मावळा) या आरोपींना अटक केली. आणखीही एक आरोपी आहे. सुनावणी वर्षभरापासून सुरु आहे. गुरुवारी दोन साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. शुक्रवारी पंच हर्षद चौधरी, फोटोग्राफरचा भाऊ श्रीकांत नामदेव शेणकर, पीडित मुलीची शाळकरी मैत्रीण उपसरपंच शंकर खैरे यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.
पीडित मुलीच्या मैत्रिणीने महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली. घटनेच्या काही दिवस अगोदर पीडितेने मुख्य आरोपी संतोष लोणकर छेडछाड करुन धमकावत असल्याचे आपल्याला सांगितले होते. आपण तिला धीर देत हा प्रकार घरी सांगण्याचा सल्ला दिला होता, असे ती म्हणाली. पीडिता शाळेत हुशार होती, तिला डॉक्टर व्हायचे होते, असेही तिने सांगितले. घटना घडली तेव्हा पीडितेचा चाचणी परीक्षेचा पेपर होता. पेपरनंतर ती लवकर घरी गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्यावर अत्याचार करुन खून झाल्याचे समजले, असे ती म्हणाली.

या खटल्यात शनिवारीही काही साक्षी नोंदवल्या जाणार आहेत. कोपर्डी लोणी मावळ्यातील बलात्कार करुन खून करण्याच्या घटनेत बरेच साम्य आहे. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीलाही आता वेग आला आहे. मध्यंतरी आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आल्यामुळे खटल्याचा वेग मंदावला होता, असे विशेष सरकारी वकिल अॅड. निकम यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...