आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीत मतदारांची भूमिका फार महत्त्वाची, जिल्हाधिकारी कवडे यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लोकशाहीमध्ये मतदारांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व व्यक्तींची मतदारयादीत नोंद झाली पाहिजे. मतदार नोंदणी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. मतदार नोंदणीबाबत जनतेत जागृती झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी वामन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी, नेहरू युवा केंद्राचे चंद्रकांत गायकवाड, निवडणूक शाखेचे तहसीलदार गुलाबसिंह वळवी, नायब तहसीलदार लोखंडे, माधुरी आंधळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कवडे यांनी या वेळी मतदानाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले मतदारांचे लोकशाहीतील स्थान अबाधित आहे. वाडिया पार्क येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून जनजागरण रॅली काढण्यात आली. कवडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.