आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासकामांत गावाची एकजूट आवश्यक, खासदार दिलीप गांधी यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विकासकामांसाठी संपूर्ण गावाची एकजूट असणे आवश्यक आहे. एकजूट असेल तरच गावाचा कायापालट होईल, असे खासदार दिलीप गांधी म्हणाले.

पारनेर तालुक्यातील दुर्गम भागातील कासारे गावाचा समावेश सांसद आदर्श योजनेत करण्यात आला अाहे. या पार्श्वभूमीवर खासदार गांधी व जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या उपस्थितीत कासारे येथे नुकतीच कामांची आढावा बैठक झाली त्या वेळी गांधी बोलत होते. नगर अर्बन बँकेचे संचालक अशोक कटारिया, संतोष भंडारी, भाजपचे तालुकाध्यक्ष पोपटराव मोरे, सरपंच धोंडिभाऊ दातीर, माजी सरपंच सुनीता निमसे, हरिभाऊ दातीर, िशवसेनेचे महेंद्र नरड आदी या वेळी उपस्थित होते.
गांधी म्हणाले, दोन गटारे, तीन इमारती अाणि चार रस्त्यांची कामे करणे एवढाच मर्यादित अर्थ या योजनेचा नाही. गावातील लोकांचा वैचारिक, नैतिक दृष्टिकोन विकसित करण्याबरोबरच सर्व लोकांचे जीवनमान उंचावणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संपूर्ण गावाची एकजूट असेल, तर योजना राबवण्यात अडचणी येणार नाहीत. राळेगणसिद्धी, हिवरेबाजारप्रमाणेच कासारेचा नावलौकिक देशभर व्हावा, असे त्यांनी सांगितले. व्यक्तिगत जीवनाचा विकास आणि उत्कर्ष करताना समाज व गावाचाही उत्कर्ष ज्यांनी साधला, त्यांचे जीवन सार्थ ठरते, असे गांधी म्हणाले.