आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनागरमध्‍य प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा दिमाखात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-प्रजासत्ताक दिनाच्या 64 व्या वर्धापन दिनी येथील पोलिस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पिचड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिर्शा, होमगार्डचे जिल्हा समादेशक डॉ. व्ही. के. भोर्डे आदी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पिचड यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.त्‍यावेळी बोलतांना पिचड म्‍हणाले, की येत्या 1 फेब्रुवारीपासून राज्यात अन्न सुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी होणार आहे. राज्यातील सुमारे 7 कोटी, तर जिल्ह्यातील 31 लाख 84 हजार 411 लाभार्थींना याचा फायदा होणार आहे. याशिवाय महाराष्ट्र सावकारी अध्यादेश 2014, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मधुकर पिचड यांनी रविवारी केले.यावेळी पोलिस दल, अग्निशामक दल, गृहरक्षक दल, स्काऊट, रस्ता सुरक्षा पथक, श्वान पथक, राष्ट्रीय हरित सेना यांच्या पथकांनी संचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. संचलनामध्ये सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, भूजल सव्र्हेक्षण आणि विकास यंत्रणा, राज्य परिवहन महामंडळ आदी शासकीय विभागांचे चित्ररथही सहभागी झाले होते.

पिचड म्हणाले, मागील दोन वर्षे जिल्ह्यात कमी पावसामुळे टंचाई परिस्थिती उद्भवली होती. 2011-12 व 2012-13 मध्ये विविध उपाययोजनांवर 1 हजार 174 कोटी 56 लाख 87 हजार रुपये खर्च करून जनतेला दिलासा देण्याचे काम राज्य शासनाने केले. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

या समारंभास जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, उपाध्यक्ष मोनिका राजळे, महापौर संग्राम जगताप, मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव, तसेच स्वातंत्र्य सैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिरोदिया हायस्कूलच्या शिक्षिका गीतांजली भावे यांनी केले.

सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांना, तर जनगणनेच्या कामाबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव व इतर अधिकारी, प्रगणक, पर्यवेक्षकांना पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते पदक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले. क्रीडा मार्गदर्शक म्हणून संजय सदाशिव साठे (सायकलिंग) व गुणवंत खेळाडू म्हणून आरती रिमान भोसले (बॉक्सिंग) यांना पुरस्कार देण्यात आले.

  • पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक देऊन गौरवण्यात आले. खेळाडू मनोहर कर्डिले व अनुष्का बोरकर यांचाही सत्कार करण्यात आला.
  • पार्वतीबाई डहाणूकर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ‘मी मराठी’ या गाण्यावर नृत्य सादर केले.
  • प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली होती.
  • ताराबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ‘शहनाई’ या गाण्यावर नृत्य केले.
  • वनविभागाने ‘प्राणी व जंगल वाचवा’चा विषयाचा चित्ररथ सादर केला.
  • रूपीबाई बोरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल बाजे या गाण्यावर नृत्य केले.
  • प्रजासत्ताकदिनानिमित्त पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात उघड्या वाहनातून पोलिस संचलनाची पाहणी करताना जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकर पिचड.


सांस्कृतिक कार्यक्रम रंगला
मुख्यालयात झालेल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींनी भाग घेतला. पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालयाने ‘मी मराठी’ हे नृत्य, महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाने ‘शहनाई नृत्य’, रूपीबाई बोरा न्यू इंग्लिश स्कूलने ‘ढोलबाजा नृत्य’, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘देश रंगीला’ हे नृत्य, तर डॉ. बाबासाहेब कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ हे गीत सादर केले. या सोहळ्यात ‘एमआयआरसी’चे बँडपथकही सहभागी झाले होते.
सांस्‍कृतिक कार्यक्रमातील काही छायाचित्रे पाहा, पुढील स्‍लाइडवर...