आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Republican Party Of India (A) News In Marathi, Shirdi Lok Sabha Seat

शिवसेनेला आखणी एक धक्का, शिर्डीत रिपाइच्या बंडाबाबत आज निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अडचणीत असलेल्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाइं) प्रदेश सचिव अशोक गायकवाड यांनी या मतदारसंघातून अर्ज भरला आहे. स्वतंत्र उमेदवारी किंवा नकारात्मक मतदान (नोटा) यापैकी एक पर्याय निवडण्यासाठी शुक्रवारी (28 मार्च) नेवासे येथे बैठक होणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.


गुरुवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उमेदवारीचा तिढा सोडवण्यात दमछाक झालेल्या शिवसेनेने अखेर माजी आमदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी गायकवाड यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच उमेदवारी अर्ज भरल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे. महायुतीने उमेदवारी कायम ठेवावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे; अन्यथा वेगळा विचार करण्याचा इशाराही दिला आहे. बंडखोरी करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणे किंवा नकारात्मक मताचा वापर करणे यापैकी एका पर्यायाची निवड करण्यासाठी शुक्रवारी दुपारी एक वाजता नेवासे येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.