आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

४० कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शहरातील ४० कोटींच्या मूलभूत सुविधांच्या कामांवरील स्थगिती उठवण्यात यावी, अशी विनंती आपण केली असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली. जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून पाइपलाइन रस्त्यावरील आनंदबन कॉलनीत रस्ता काँक्रिटीकरणाला प्रारंभ करताना ते बोलत होते. या वेळी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक मनोज दुलम, सीताराम आडसूळ, भाग्यश्री शेवाळे, भारती गाडेकर, कल्पना पुंडे, सिंधू गोरे, शबाना शेख, मंजिरी भारदे, अरुणा करंदीकर, अपूर्वा जोशी, सुनीता पानसंबळ, भारती कोल्हे, लता शिंगणे आदी उपस्थित होते.

जगताप म्हणाले, शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी १४५ कामे रोखून शहराच्या विकासात आडकाठी निर्माण केली आहे. निवडणूक झाल्यानंतर आपसातील मतभेद विसरून विकासासाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. मुख्यमंत्री हे कोण्या एका पक्षाचे नाहीत, तर ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मीदेखील कुठल्या पक्षाचा आमदार नसून जनतेचा आमदार आहे. पक्षीय राजकारण केवळ निवडणुकीपुरते केले पाहिजे. मूलभूतच्या ४० कोटींच्या कामांना विरोधकांनी आडकाठी आणली. या कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी मी चर्चा केली. या कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी त्यांना विनंती केली आहे. लवकरच ही कामे मार्गी लागतील, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

महापौर कळमकर म्हणाले, शहर विकासासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून कामाला सुरुवात केली आहे. आनंदबन काॅलनीत काँक्रीटचा रस्ता झाल्यानंतर नागरिकांची गैरसोय दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील प्रलंबित विकासकामे लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...