आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक बारवांमध्ये मूर्तींचे विसर्जन न करण्याचे आवाहन, निर्माल्य टाकून पाणी दूषित करू नका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बारा दिवसांच्या पाहुण्याला निरोप देताना पाण्याचे साठे प्रदूषित होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. मूर्तींचीही विटंबना त्यामुळे टळेल, असे आवाहन ‘स्वागत अहमदनगर’च्या वतीने भाविक सार्वजनिक गणेश मंडळांना करण्यात आले आहे. 
 
यावर्षी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची प्रतिष्ठापना करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले. आपल्या हाताने तयार केलेली माती मूर्ती बसवून घरच्या घरीच बादलीत तिचे विसर्जन करावे, असे आवाहन दैनिक दिव्य मराठीने केले होते. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जलप्रदूषण कमी होण्यास मदत झाली. 

नगर शहरात अनेक बारवा आहेत. यातील काही कित्येक शतकांपूर्वीच्या असून एकेकाळी त्यांनी संपूर्ण शहराला पिण्याचे पाणी पुरवले आहे. आता नळाने पाणी येत असल्याने नगरकरांना या बारवांची किंमत राहिलेली नाही. 

आसपासचे लोक तेथेच कचरा टाकत असल्याने या बारवा म्हणजे कचराकुंड्या झाल्या आहेत. अनेकजण त्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. त्यामुळे मूर्तींचे पावित्र्य भंग होते. त्यामुळे नागरिकांनी बारवांमध्ये टाकू नये, असे आवाहन इतिहासप्रेमी नागरिकांच्या स्वागत अहमदनगर ग्रूपने केले आहे. नगर-जामखेड रस्त्यावरील ऐतिहासिक हत्ती बारवेची विविध संस्था, संघटना इतिहासप्रेमींनी मागील तीन वर्षांत स्वच्छता केली. तथापि, नंतर अनेक जण तेथेच मूर्ती निर्माल्य टाकतात. त्यामुळे ही बारव पुन्हा खराब होते. यंदा नागरिकांनी, विशेषत: आसपासच्या गावांतील रहिवाशांनी या बारवेत विसर्जन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासन लष्कराच्या वतीने तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. 
 
नगर-जामखेड रस्त्यावरील हत्ती बारवेची मागील वर्षी स्वच्छता करण्यात आली. नुकत्याच झालेल्या पावसाने ही बारव चांगली भरली आहे. या बारवेत गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये, असे आवाहन स्वागत अहमदनगर ग्रूप शहरातील इतिहासप्रेमी नागरिक संघटनांनी भाविकांनी केले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...